संत तुकारम पालखी सोहळ्यासाठी चेन्नईहून तयार केली छत्री
पुणे: संत तुकाराम महाराज्यांच्या 339 व्यापालखी सोहळ्यानिमित्त संस्थांनाच्या वतीने नवीन पालखी तयार करण्यात आली आहे, पुण्यात असणाऱ्या विठ्ठल मंदिराचे सेवेकरी राजेश भुजबळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही छत्री चेन्नईवरून तयार करून आणली आहे. या छत्रीसाठी वेलवेटचे कापड वापरण्यात आले असून संपूर्ण विनाकाम हाताने करण्यात आले आहे. अब्दागिरी, गरुड, टक्के, रेशमी ध्वज, पताका या छत्रीच्या गोष्टी लक्ष वेधून घेत आहेत. या छत्रीचे वैशिष्ट्ये म्हणजे यावर शंख, चक्र, तिलक, हनुमान, गरुड यांची चित्रे साकारण्यात आली आहेत.