महायुतीचाच उमेदवार निवडून येणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे निरंजन डावखरे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रमेश किर निवडणुकीच्या रिंगणात आहेत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पत्नीसह डोंबिवलीतील मतदान केंद्रावर दाखल झाले, मंत्री चव्हाण यांच्या पत्नी सुहासिनी चव्हाण यांनी मतदान करत मतदानाचा हक्क बजावला, यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकण पदवीधर मतदारसंघ हा वर्षानुवर्ष महायुतीचा बालेकिल्ला राहिलाय, या मतदारसंघात यंदा देखील महायुतीचाच उमेदवार निवडून येईल असा विश्वास बोलून दाखवला