पुणे अपघात : आरोप फेटाळले, मोहिते पाटील पुतण्याची बाजू घेत म्हणाले….

पुणे : पुण्यातील पोर्शे अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच पुणे नाशिक महामार्गावरील कळंब येथे दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात १९ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने बेदरकारपणे गाडी चालवून अपघात केल्याचे समोर आले आहे. परंतु याप्रकरणात मदार मोहिते पाटील यांनी पुतण्याची कड घेतली आहे.

कळंब येथे कार चालकाने दुचाकीवरील दोघांना चिरडले. यातील एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. कार चालक मयूर मोहिते पाटील हा आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या आहे. आपल्या पुतण्याने मद्यपान केलेले नव्हते तसेच अपघातानंतर तो पळूनही गेला नव्हता, असा दावा आमदार मोहिते यांनी केला आहे.
Pune News: आमदाराच्या पुतण्याचा कारनामा! राँग साईडने कार पळवली, दोघांना चिरडलं, एकाचा मृत्यू; पुण्यात मध्यरात्री थरार

आमदार दिलीप मोहिते पाटील अपघातावर काय म्हणाले?

माझा पुतण्या मयूर मोहिते पाटील हा अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आहे. अपघाताविषयी पोलीस अजूनही त्याची चौकशी करतील.वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी मयूरचे सॅम्पल्स घेतलेले आहेत. अपघातग्रस्त तरुणाला मयूरने अॅम्बुलन्समध्ये टाकले होते. त्यामुळे त्याच्यावरील आरोपांत मला तथ्य वाटत नाही. पण मी अपघातस्थळी नव्हतो. त्यामुळे यासर्व घडामोडींविषयी मी अधिक माहिती घेईन, असे दिलीप मोहिते पाटील म्हणाले.
आमदार पुतण्याच्या कारच्या धडकेत एकाचा अंत; राँग साईडनं कार पळवणारा मयूर मोहिते पाटील कोण?

आमदार मोहिते यांचा पुतण्या दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. तसेच अपघातानंतर मयूर गाडीतच बसून राहिला. अखेरपर्यंत तो गाडीबाहेर आलाच नाही, अशी माहितीही स्थानिकांनी दिली. दरम्यान, वैद्यकीय चाचणीचे अहवाल काय येतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अपघात कसा झाला?

मयूर मोहिते हा त्याच्या फॉर्च्यूनर गाडीने (क्रमांक एम एच १४ के जे ७५५७ ) कळंबकडून मंचरच्या दिशेने जात होता. त्याचवेळी बंटी सुनील भालेराव हा दुचाकीवरून कळंबकडे चालला होता. एकलहरे गावच्या हद्दीत पिकअप गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात मयूरच्या फॉर्च्युनर गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला.