मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल पुतीन होण्याच्या दिशेनं सुरू आहे. देशात हुकूमशाही आणण्याकडे त्यांची वाटचाल सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अनेकदा करत आहेत. त्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखेर उत्तर दिलं आहे. शरद पवारांबद्दल मला आजही आदर आहे. सार्वजनिक काळात ज्यांनी ज्यांनी प्रदिर्घ काळ काम केलंय, त्या सगळ्यांबद्दल माझ्या मनात आदराची भावना आहे. मग त्या व्यक्ती माझ्या सोबत असोत वा विरोधात असोत, असं मोदी म्हणाले.
शरद पवारांना ज्यांच्यामध्ये पुतीन दिसतो, त्यांच्याच सरकारकडून पद्मविभूषण मिळाल्याचा त्यांना अभिमान वाटतो. ही खूप मोठी विसंगती नाही का?, असा सवाल मोदींनी विचारला. आपल्या सरकारच्या काळात देण्यात आलेल्या भारतरत्न पुरस्कारांबद्दलही मोदींनी सविस्तर भाष्य केलं. ‘आम्ही प्रणब मुखर्जी, पी. व्ही नरसिंह राव, चौधरी चरणसिंह, कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न दिले. त्यावेळी या देशातल्या कोणीही प्रश्न केला नाही यांना का भारतरत्न देताय? कारण हे सगळे नेते त्या पुरस्कारासाठी पात्र होते, अशीच सर्वांची भावना होती आणि आजही आहे. ही सगळी नेते मंडळी कोणत्या पक्षाची होती? ते सगळेच आमच्या विरोधात अनेकदा बोलले, टीका केली. पण भारतरत्न देण्याचा निर्णय त्यावर होत नाही. त्यांचं कर्तृत्त्व, त्यांचं सामाजिक योगदान पाहून पुरस्काराचा निर्णय घेतला जातो,’ असं मोदींनी सांगितलं.
मोदी सरकारच्या काळात दिल्या गेलेल्या पद्म पुरस्कारांवरही त्यांनी भाष्य केलं. ‘आम्ही कोणाकोणाला पद्म पुरस्कार दिले? मुलायम सिंह, यादव, आसामचे तरुण गोगोई, पी. ए. संगमा, जमीर, एस. एम. कृष्णा यांचा पद्म पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. हे सगळे नेते दुसऱ्या पक्षाचे आहेत. आम्ही त्यांचा गौरव केला. त्यांच्या योगदानाचा सन्मान केला. त्यासाठीच त्यांना सन्मान दिला गेला, असं मोदी म्हणाले.
ज्या ज्या राजकीय नेत्यांनी देशासाठी काम केलं, त्यांचा त्यांचा आम्ही सन्मान केला. कारण पुरस्कार हा देशाचा आहे, तो काही एका पक्षाचा दलाचा नाही. पद्म पुरस्कार म्हणजे मोदींची पर्सनल प्रॉपर्टी नाही. भाजपचा त्यावर कॉपीराईट नाही. आमच्या सत्ताकाळात आम्ही कर्तृत्त्ववानांचा सन्मान केला. योगदान देणाऱ्यांचा गौरव केला, असं म्हणत मोदींनी पुरस्कारांमध्ये राजकारण नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला.

तुम्ही शरद पवारांना पद्मविभूषण देता. आता तुम्हीच त्यांच्यावर टीका करता, ते तुम्हाला पुतीन म्हणतात. याचा अर्थ नेमका काय, असा प्रश्न मोदींना विचारला गेला. त्यावर पुरस्कार कसा दिला हा प्रश्न कसा काय असू शकतो, असा उलटप्रश्न मोदींनी केला. आम्ही तुम्हाला पद्म पुरस्कार देतो. मग तुम्ही गप्प बसा, असा करार थोडीच असतो? पुरस्कार हे पुरस्कार असतात. तो व्यक्तीचा सन्मान असतो. त्यामागे गिव्ह अँड टेक नसतं, असं मोदी म्हणाले.