सुप्रिया सुळेंनी काय किस्सा सांगितला?
माझी सगळ्यात लाडकी स्टोरी धोंडं जेवण म्हणतात ना.. त्याची आहे. मला हे कौतुकास्पद वाटतं, कारण शिंदेंनी (प्रतिभा पवार यांचे माहेर) कधी पवारांना बोलावलं नाही, ना पवारांनी कधी सदानंद सुळेंना बोलावलं. मला धोंडं जेवण काय असतं, हे माहितच नव्हतं, मला धोंडं जेवण कुणामुळे कळलं तर रीलमुळे… असं सुप्रिया सुळे सांगत होत्या.
जावयाने सासूचे पाय धुवावेत
पुढे त्या म्हणाल्या, की कोणीतरी मला सांगितलं, दर तीन वर्षांनी जावयाला बोलवायचं आणि जावयाचे पाय धुवायचे… म्हटलं कशासाठी… तर म्हणाले अशीच पद्धत असते… मी म्हटलं, माझ्या लोकसभा मतदारसंघात मी बदल करणार… जरुर धोंडी जेवण करा… माझा त्याला विरोध नाही.. पण असं करुया आपण.. सासूने त्याचे पाय धुवायच्या ऐवजी.. जावयाने सासूचे आणि आईचे पाय धुवायला पाहिजेत… की एवढी सोन्यासारखी मुलगी आम्हाला दिलीत… असा बदल सुप्रिया सुळे यांनी सुचवला.
जावयाला मुलगा करा आणि सुनेला मुलगी
घरी जेवायला बोलवा.. घरी जेवायला जा… पुरणपोळी करा.. काही करा.. पण आई वडिलांना पाय धुवायला लावू नका.. हे कुठेतरी थांबलं पाहिजे.. जावयाला मुलगा करा आणि सुनेला मुलगी करा.. डोक्यावर बसवा… हृदयात ठेवा.. धोंडे जेवण हे निमित्त आहे… पण लोकप्रतिनिधी बदल करतो, तेव्हा सर्वांना पटतं.. यालाच सामाजिक क्रांती म्हणतात, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
रोज पाच मिनिटं रील बघते
दरम्यान, मी रोज पाच मिनिटं रील बघते, हे मी कबूल करते, पण मी पाचच मिनिटं बघते. माझ्या फोनला लॉक आहे. जर मी २४ तासात पाच मिनिटं रील पाहिलं, तर माझं रील लॉक होतं. नाहीतर दोन तास गेले-झालं… खासदारकी तिथेच गेली रील बघण्यात, अशी मिश्कील टिपणीही सुप्रिया सुळेंनी केली.
तुम्हालाही विनंती करेन पाचच मिनिटं रील बघा. पण त्यात बघता ते खरं नसतं, काल ते पत्रकार मला सांगत होते, कॉमेंट द्यायला. वंदनाताई तु्म्ही पण जरा लक्ष द्या… आज काल मी बघते पुणेकरांमध्ये.. रील करुन नको नको ते व्हायला लागलंय.. हे कुठेतरी थांबवा.. त्यात रिस्कही इन्व्हॉल्व आहे… रील्स गंमत म्हणून ठीक आहे… पण गंमत आहे, हे समजून करा… मी वर्तमानपत्रात पाहते, अतिशय काळजीचं आहे. त्यामुळे रीलमध्ये सेफ्टी फर्स्ट. घरी जाऊन प्रत्येकाने प्लीज हे मुलांना सांगा, अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली.