देसाई रुग्णालयातील आयसीयूमध्ये वैध नोंदणी नसलेले डॉक्टर कार्यरत, एमएमसीने बजावली नोटीस

प्रतिनिधी, मुंबई : वैध परवान्याशिवाय वैद्यकीय सेवा देणाऱ्या पालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयातील दोन डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसीने ) नोटीस बजावली आहे. अॅड. तुषार भोसले यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने पॅथॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करणाऱ्या दोन डॉक्टरांना नोटीस बजावली. यापूर्वीही रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये वैध नोंदणी नसलेले डॉक्टर काम करताना आढळून आले होते.सप्टेंबर २०२३ पॅथॉलॉजी विभागामध्ये वैद्यकीय सेवा देणारे दोन डॉक्टर असून विविध वैद्यकीय अहवालांवर त्यांची स्वाक्षरी असते. नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडे अपेक्षित असणारा आरएमपी क्रमांक त्यांच्याकडे नाही. राज्यात वैद्यकीय सेवा देण्यापूर्वी एमएमसीमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे त्यांना पॅथॉलॉजीच्या पदव्युत्तर एमडी अभ्यासक्रमाला प्रवेश कसा मिळाला, हा कळीचा प्रश्न आहे.

उन्हाच्या तडाख्याने भाज्यांचे भाव कडाडले; लसणाची फोडणीही परवडेना, जाणून घ्या दर
परिषदेकडे पॅथालॉजी अभ्यासक्रमाची कोणतीही नोंदणी नाही. वैध नोंदणीशिवाय वैद्यकीय प्रॅक्टिस करणे बेकायदा आहे. तरीही त्यांना मान्यता कशी दिली, असा प्रश्न अॅड. तुषार भोसले यांनी उपस्थित केला. अॅड. भोसले यांना एमएमसीकडून यासंदर्भातील रितसर मेल प्राप्त झाला आहे.