‘गाडी क्रमांक ११०५९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते छपरा एक्स्प्रेसमधून सर्वाधिक २८२ प्रवाशांना स्थानकांवर उतरवण्यात आले.(११०६१) जयानगर एक्स्प्रेसमधून २०० प्रवाशांना उतरवण्यात आले आहे. मुंबईतून सुटणाऱ्या ३१ मेल-एक्स्प्रेसची तपासणी केल्यानंतर सुमारे १,६०० प्रवाशांना विविध स्थानकात उतरवण्यात आले आहे’, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले.
ऑनलाअन प्रतीक्षायादीतील तिकीट कन्फर्म झाले नाही तर ते रद्द होऊन त्याचा परतावा प्रवाशांच्या थेट बँक खात्यात जमा होतो. तिकीट खिडकीवरील कन्फर्म नसलेले तिकीट प्रवाशांना रद्द करावे लागणार आहे. रेल्वेगाडीचा चार्ट साधारण चारतास आधी तयार होतो. त्याचवेळी तिकीट कन्फर्म झाले की नाही, याची माहिती प्रवाशांना समजते. गाडी सुटण्याच्या अर्धा तास आधी प्रतीक्षायादीतील तिकीट प्रवाशांनी रद्द केल्यास त्याचा पूर्ण परतावा प्रवाशांना मिळणार आहे. गाडी गेल्यानंतर तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना कोणताही परतावा मिळणार नाही.
…तर प्रवास करता येणार
शयनयान श्रेणीच्या प्रतीक्षायादीच्या तिकीटावरून सामान्य श्रेणीतून प्रवास करण्याची मुभा आहे. गाडीतील वातानुकूलित डब्यात आसन रिक्त असल्यास तिकीटांतील फरक भरून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे, असे ही रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.