प्रतिनिधी, पुणे : पुणे शहर लोकसभा मतदारसंघात अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता पुण्याच्या रिंगणात ३५ उमेदवार उतरले आहेत. त्यामुळे कोणता उमेदवार कोणाची मते खाणार, कोणाला फटका बसणार हे स्पष्ट होणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातही ३२ उमेदवार रिंगणात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे लोकसभेसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत ४२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारी घेण्याची सोमवारी शेवटची मुदत होती. त्यात ४२पैकी सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे रिंगणात ३५ उमेदवार राहिले आहेत. उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. पुण्यात भाजपसह ‘महायुती’कडून मुरलीधर मोहोळ, ‘काँग्रेस महाआघाडी’कडून रवींद्र धंगेकर आणि ‘वंचित बहुजन आघाडी’कडून वंसत मोरे या तिघांमध्ये प्रमुख लढत होणार आहे. दरम्यान, निवडणूक चिन्ह वाटपावेळी निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊ गलांडे, समन्वयक अधिकारी प्रतिभा इंगळे, अनिल पवार आदी उपस्थित होते.
शिरूर लोकसभेसाठी एकूण ३५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीन उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने ३२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अंतिम उमेदवार राहिलेल्यांत मनोहर वाडेकर या अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळाले आहे. या मतदारसंघात ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या दोन गटांत लढत होत आहे. शरद पवार गटाकडून डॉ. अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात ही लढत होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अन्वर शेख यांना उमेदवारी दिली आहे. अंतिम झालेल्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी चिन्हाचे वाटप केले.