मावळ, पुणे: मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे दहशत पसरविण्यासाठी रात्री साडेआठच्या सुमारास भर चौकात हवेत गोळीबार करण्यात आला आहे. अज्ञात तिघांनी दुचाकीवरून जात असताना गजानन महाराज चौक आणि मारुती मंदिराजवळ असा दोन वेळेस हवेत गोळीबार केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. नेमका हा गोळीबार कशासाठी आणि का करण्यात आला? याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी घटना स्थळावरून गोळीच्या पुंगळ्या मिळाल्या आहेत. यात कोणतीही हानी झालेली नाही. फक्त दहशत पसरवण्यासाठी गोळीबार केला की आणखी काही कारण होते याचा तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील हनुमान मंदिराजवळ नेहमीच वर्दळ असते. अशा ठिकाणी हवेत गोळीबार केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हवेत गोळीबार केल्यानंतर नेमका हा कुणाला इशारा होता का? असे देखील बोललं जात आहे. मावळ तालुक्यात गुन्हेगारी दिवससेंदिवस वाढताना पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी जुन्या वादातून एका टोळक्याने एका तरुणाची हत्या केली होती. त्यानंतर ही घटना घडल्याने सामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या वर्दळीच्या ठिकाणी हा गोळीबार झाल्याने नागरिकांची एकच पळाापळ झाल्याची पहायला मिळेल.

या घटनेनेनंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. तीन ते चार जणांच्या टोळक्याने हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांचा तपास सुरु केला आहे. या प्रकरणी अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहे. दरम्यान पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस हत्या, गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. या प्रकरणी प्रशासनाने कठोर पाऊले उचलणे गरजेचं झाले आहे.