आतापर्यंत भाजपकडून २०१९ ते लोकसभा निवडणूक होईपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पाहिले जात होते. पण, फडणवीस हे सांगत होते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालीच आगामी निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. पण, लोकसभा निवडणुकीने सर्व गणितं फिरली आणि भाजपला हा निर्णय घ्यावा लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी याचा निर्णय हायकमांड आणि इतर वरिष्ठ मंडळी घेतली असे म्हणत चेंडू टोलवला आहे.
या संदर्भात द न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार महाराष्ट्रात भाजपची नियमीतपणे कोअर कमिटीची बैठक आणि राज्य पार्लमेंट्री बोर्डाचे बैठक का घेतली जात नाही अशा प्रकारची विचारणा करण्यात आली. तसेच कोणतेही निर्णय एकट्या व्यक्तीने घेऊ नये अशी तंबीही यावेळी देण्यात आल्याचे समजते. या बैठकीला उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आणि पंकजा मुंडे आदी उपस्थित होते.
२०१९ च्या निवडणुकीत भाजपला एकट्याला १०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या तरी लोकसभेत त्यांची कामगिरी सुमार राहिली फक्त ९ जागा निवडून आणण्यात त्यांना यश आले. काँग्रेसने दमदार कामगिरी करत १३ जागांवर दणदणीत विजय मिळविला. तसेच सांगलचीचे अपक्ष आमदार विशाल पाटील यांनी पाठिंबा दिल्याने त्यांची खासदारांची संख्या १४ वर गेली आहे. आता घोडा मैदान जवळ आहे. अवघ्या तीन महिन्यात राज्यात पुन्हा विधानसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. त्यावेळी फटका बसू नये यासाठी भाजपने आस्ते कदम टाकत फडणवीसांना प्रोजेक्ट करण्याचे टाळ्याचे सूत्रांनी सांगितले आहे.