गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीची पत्रकारपरिषद झाली. सगळे घटकपक्ष सोबत होते. त्यावेळी सर्वांना धन्यवाद दिले आहेत. मात्र आता पुन्हा एकद शिवसेनेच्या वतीने ज्या ज्या देशभक्ताने महाविकास आघाडी, शिवसेने मतदान दिलं, आर्शीवाद दिले त्या सर्व देशभक्तांना मनापासून देतो असं म्हणत त्यांनी देशवासियांचे आभार मानले. तसंच आता पराभव जिव्हारी लागला पण त्याचा वचपा काढणार, बदला घेणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी भरसभेत म्हटलं.
शिवसेना प्रमुखांनी दोन गोष्टी सांगितल्या होत्या. आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठेही गेलात तरी मरण नाही. मात्र आत्मविश्वास आणि अहंकार यात फरक आहे. आत्मविश्वास म्हणजे होय हे करु शकतो, यांना पाडू शकतो…पण हे एकटाच मी करू शकतो हा अहंकार आहे आणि तो पंतप्रधान मोदींमध्ये आहे, असं म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर टिका केली.
‘निवडणुकीच्या निकालांचं विश्लेषण सुरू आहे. भाजपला तडाखा बसला आहे. पण आता विषयांतर कसं करायचं हे त्यांना माहिती आहे. म्हणूनच निवडणूक झाल्यानंतर त्यांनी सुरू केलं, की उद्धव ठाकरे हे पुन्ही मोदींसोबत, एनडीएमध्ये जाणार. ज्यांनी आपल्याला संपवायचा प्रयत्न केला, मातेसमान शिवसेनेला खतम करण्याचा प्रयत्न केला त्यांसोबत जायचं? गैरसमज पसरवून द्यायचा प्रयत्न सुरू आहे. स्वत:चं अपयश झाकून ठेवायचा प्रयत्न आहे,’ अशी भाजपवर टिका करत त्यांनी कधीही एनडीएमध्ये जाणार नसल्याचं सांगितलं.
‘हे सरकार काय चालेल असं मला वाटत नाही, आणि चालू नये असंच माझं मत आहे. सरकार चालेल का, पडेल का असं नाही तर पडलंच पाहिजे. पुन्हा निडवणुका झाल्याच पाहिजेत. नाहीतर आम्ही इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करू. असा आरोप केला जातो शिवसेनेला हिंदू, मराठी मत मिळाली नाहीत. मात्र संपूर्ण देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळाली आहेत. मुसलमानानीही मतं दिली आहेत. मी हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला जातो, मात्र देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं असल्याचं स्पष्ट आणि ठाम मत आहे’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
अनेकांनी लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. अनेकांनी आम्हाला मतदान करण्यासाठी प्रचार केला. शिंदे यांनी याला शहरी लष्करवाद, आतंकवाद म्हटलं होतं. जर लोकशाही वाचवा हा आतंकवाद असेल, तर मी आतंकवादी आहे. देश, देशाचं संविधान वाचवा हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे, असं म्हणत सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप त्यांनी शिंदे सरकारवर केला आहे. शिवसेना प्रमुखांचा फोटो न लावता, धनुष्यबाण न लावता निवडणुका लढवून दाखवा, नाव-वडील न चोरता निवडून या, असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारला दिलं आहे. त्याशिवाय बिनशर्ट पाठिंबा दिल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनाही टोला लगावला.
शिवसेना संपवण्याचे अनेकदा प्रयत्न झाले, मात्र शिवसेना सर्वांना पुरुन उरली आहे. हार-जीत होत असते. निवडणूक हारलो तर पुन्हा जिंकेन, पण हिंमत हारलो तर पुन्हा जिंकू शकणार नाही. मी हिंमत हारणार नाही. मी तुम्हाला हिंमत हारू देणा नाही. काही ठिकाणी निडणूक जरुर हारलो असेल, पराभव जिव्हारी लागला आहे, पण त्याचा बदला मी जरुर घेणार, असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.