लखनौला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमधून पाच प्रवासी खाली पडल्याची माहिती समोर येत आहे. दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान हे प्रवासी खाली पडले. छत्रपती शिवाजा महाराज टर्मिनलवरून ही एक्स्प्रेस निघाली होती. या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचवण्याची व्यवस्था तातडीने केली जात असल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला यांनी दिली. त्याचप्रमाणे या घटनेनंतर रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सर्वात मोठी बातमी ! धावत्या पुष्पक एक्सप्रेसमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू, दिवा-कोपरदरम्यान धक्कादायक घटना; प्रवासी हादरले
