पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण, संतापलेल्या पत्नीने पतीवर उकळते तेल फेकले

गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्हा चर्चेत आहे. या जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर इतर काही खुनाची तसेच अमानुष मारहाणीची प्रकरणं समोर आली आहेत. असे असतानाच आता बीडमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Crime News: पती आणि पत्नी यांचे नाते सात जन्माचे म्हटले जाते. या नात्यांमध्ये अनेक कडू गोड आठवणी येत असतात. दोघांमध्ये कधी कधी नोकझोक होत असते. रुसवा फुगवा होत असतो. परंतु टोकाची भूमिका घेतली जात नाही. याला अपवाद कल्याणमधील घटना आह. पती-पत्नी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात पत्नीला प्रचंड संताप झाला. मग तिने उकळते तेल पतीवर फेकले. त्यात पती गंभीर जखमी झाला आहे. या प्रकारानंतर पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेहरा-डोळ्यास गंभीर इजा

कल्याणच्या गोवंडी मोहल्ल्यात शेख कुटुंब राहतात. इम्रान शेख आणि दिवा शेख यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले. या दोघांमध्ये मध्यरात्री वाद झाला. त्यानंतर दिवा शेख या संतप्त झाल्या. त्यांनी इम्रान शेख यांच्यावर उकळते तेल फेकण्याचा धक्कादायक प्रकार केला. या घटनेत इम्रान शेख जखमी झाले. त्यांच्या चेहरा, डोळ्यास गंभीर इजा झाली. शरीराच्या इतर भागावर जखमा झाल्या. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

इम्रान शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पत्नी दिवा शेखविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी पत्नीला अटक नाही. बाजारपेठ पोलिसांकडून तपास सुरू आहे. पती आणि पत्नीमधील या भांडणाचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिसांकडून इम्रान शेख यांचा जबाब घेण्यात येणार आहे.

पॉक्सो कायद्यातील आरोपी फरार

टिटवाळा पोलिसांच्या ताब्यात असलेला पॉक्सो कायद्यातील एक सराईत आरोपी कल्याण न्यायालय परिसरात पोलीसांना चकवा देत थरारकपणे फरार झाला आहे. कल्याण तालुका टिटवाळा पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांच्या हाताला झटका देत पोलिसांच्या निष्काळजीपणाचा फायदा घेत आरोपीने गर्दीचा उपयोग करत पलायन केले. या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चैतन्य राजू शिंदे (वय २१, रा. रोहिदासनगर, रोहा, रायगड) असे आरोपीचे नाव आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)