मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानी येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्मारकारचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या येत्या २३ जानेवारीच्या जयंतीच्या निमित्ताने स्मारक सर्वसामान्य जनतेसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. तर जुलै महिन्याअखेरपर्यंत बांधकाम पूर्ण होऊन ऑगस्टमध्ये स्मारकातील इंटीरियरच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भेट दिली. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, तेजस ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे तीन-चार महिने स्मारकाकडे येता आले नाही. परंतु, या तीन महिन्यांत स्मारकाचे काम चांगल्या पद्धतीने झाले आहे. आतापर्यंत स्मारकाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून उर्वरित काम ऑगस्टमध्ये सुरु होईल, असे ठाकरे यांनी सांगितले. स्मारकाच्या बाजूला मोठा समुद्रकिनारा आहे. खाऱ्या पाण्याचा रेटा येथे प्रचंड येत असतो. समुद्रावरील वेगाच्या वाऱ्यांवर, अडचणींवर मात करत स्मारकाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. अजून काही बारीक-सारीक गोष्टी अपूर्ण आहेत. लवकरच त्या पूर्ण होतील. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असे संग्रहालय देखील येथे बांधण्यात येणार आहे. शिवाय, महापौर निवासस्थानाचे वारसा जतन आणि संवर्धनाची सुध्दा जबाबदारी आहे. तरीही लवकरच हे काम पूर्ण होऊन बाळासाहेबांच्या जंयतीपर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी खुले करण्याचा प्रयत्न आहे, असे ठाकरे म्हणाले.

दरम्यान राज्यात लोकसभा निवडणुकीत दोन्ही शिवसेनेला मिळालेले यश, आगामी विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशा दोन्ही पक्षांचा वर्धापन दिन बुधवारी मुंबईत साजरा केला जाणार आहे. शिवसेनेचा हा ५८ वा वर्धापन दिन असणार असून या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून षण्मुखानंद सभागृहात तर शिंदेच्या शिवसेनेकडून वरळीच्या डोम येथे वर्धापन दिन साजरा केला जाणार असून यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे नेमकं काय भाष्य करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.