मध्य रेल्वेचा रविवारी ब्लॉकवार, पाहा कुठे-कुठे ब्लॉक

मुंबईकरांसाठी नेमचि येतो पावसाळा त्याप्रमाणे रविवारच्या ब्लॉकचे टेन्शन असते. मध्य रेल्वेने  रविवार दि. ०८ जून२०२५ रोजी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे.  विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मुंबई डिव्हीजनमधील उपनगरीय मार्गांवर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार  आहे. त्यामुळे प्रवाशांनी रविवारी घरातून निघताना नियोजन करुनच प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य मार्गावरील ब्लॉक विभाग:

विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी ८.०० ते दुपारी १.३० पर्यंत ५ व्या आणि ६ व्या मार्गावर

अप मेल-एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन

पुढील अप मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जाणाऱ्या गाड्या विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.

* गाडी क्र. 11010 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस

* गाडी क्रमांक 12124 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन

* गाडी क्रमांक 13201 पाटणा- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

* गाडी क्रमांक 17221 काकीनाडा- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

* गाडी क्रमांक 12126 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस

* गाडी क्रमांक 12140 नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

* गाडी क्रमांक 22226 सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस

* गाडी क्रमांक 12168 बनारस- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

* गाडी क्रमांक 12321 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

* गाडी क्रमांक 12812 हटिया -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

* गाडी क्रमांक 11012 सोलापूर -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस

डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन

* पुढील डाउन मेल/एक्सप्रेस गाड्या विद्याविहार स्टेशनवर डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि पाचव्या मार्गावर ठाणे येथे पुन्हा वळवल्या जातील.

* गाडी क्रमांक 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपुर एक्सप्रेस

* गाडी क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्सप्रेस

* गाडी क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस -तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस

* गाडी क्रमांक 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस- काकीनाडा एक्सप्रेस

हार्बर लाईनवर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत

पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट लाईन वगळून) अप आणि डाउन हार्बर लाईनवर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक आहे.

हार्बर लाईन ब्लॉक विभाग

पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या अप हार्बर लाईनवरील सेवा सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत आणि
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल/बेलापूर येथे जाणाऱ्या डाउन हार्बर लाईनवरील सेवा सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत रद्द राहतील.

ट्रान्स हार्बर लाईन ब्लॉक विभाग

पनवेल येथून ठाणे येथे जाणारी अप ट्रान्स- हार्बर लाईन सेवा ११.०२ ते १५.५३ पर्यंत आणि ठाणे येथून पनवेल येथे जाणारी डाउन ट्रान्स-हार्बर लाईन सेवा १०.०१ ते १५.२० पर्यंत रद्द राहतील.

ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी विभागात विशेष लोकल चालतील.

ब्लॉक काळात ठाणे- वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स- हार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील.

ब्लॉक काळात बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असतील.

————

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)