प्रतिनिधी, मुंबई : बहुचर्चित सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मुंढे यांच्याकडे आता असंघटित कामगार विभागाच्या आयुक्त पदाची नवी जबाबदारी देण्यात आली आहे. मुंढे यांच्यासह इतरही काही अधिकाऱ्यांच्या बदलींचा निर्णय यावेळी घेण्यात आला असून यात राज्याच्या कुटुंब कल्याण, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त म्हणून अमगोथु श्री रंगा नायक यांची नियुक्ती केली आहे.
राज्य सरकारतर्फे बदलींचा निर्णय जाहीर करताना सनदी अधिकारी धीरजकुमार यांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले असून केंद्रीय सेवेत प्रतिनियुक्तीवर गेलेल्या व्ही राधा यांची राज्याच्या कृषी विभागाच्या प्रधान सचिव, आणि रणजित कुमार यांची यशदाच्या अतिरिक्त महासंचालक पदी नियुक्ती केली आहे. तर वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र वर्धा जिल्हा परिषदेच्या सीईओ पद रिक्त ठेवण्यात आले आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडे असलेल्या सध्याचा कार्यभार राजेश कुमार यांच्याकडे देण्यात आला आहे.
दरम्यान, ऑक्टोबरच्या सुरुवातीला राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक आणि आरोग्य सेवा आयुक्त म्हणून नियुक्त झालेले आएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची मंगळवारी बदली करण्यात आली. मागील सहा वर्षातील त्यांची ही नववी बदली आहे.
धडाडीचे अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची संपूर्ण राज्यभरात ओळख आहे. २००५ मध्ये तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या पहिल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. ते सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून पहिल्यांदा रुजू झाले होते. त्यांच्या १९ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची जवळपास १९ वेळा बदली झाली आहे. मुंबईसह सोलापूर, नागपूर, पुणे, कल्याण अशा अनेक ठिकाणी तब्बल १९ वेळा बदली करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांच्यासह इतरही काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. रणजीत कुमार, नीमा अरोरा, व्ही. राधा, अमन मित्तल, अमगोथू श्रीरंगा नायक, रोहन घुगे यांच्याही बदल्या झाल्या आहेत.