भाज्यांची कमतरता जाणवणार
बाजारात भाज्यांची आवक अगदी ६० टक्केच होत आहे. त्यामुळे भाजीविक्रेत्यांच्या दुकानातही नेहमीसारख्या भाज्या पाहायला मिळत नाही. शिवाय ज्या काही भाज्या आहेत, त्यांचे दरही १०० रुपये प्रति किलोच्या वर गेले आहेत. त्यामुळे कोणत्या भाज्या खरेदी कराव्यात, असा प्रश्न गृहिणींना पडत आहे. सध्याचे वातावरण पाहता पावसाळा लांबल्यास आणखी महिनाभर भाज्यांची कमतरता जाणवत राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी महिनाभर तरी वाढलेल्या दरानेच भाज्या खरेदी कराव्या लागणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
घाऊक बाजारातील भाज्यांचे दर किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर
(रुपयांत प्रतिकिलो) (रुपयांत प्रतिकिलो)
भेंडी – ४५ ते ५० रु. ७० ते ८० रु
फरसबी ८० ते १०० १०० ते १२०
गवार ८० ते ९० १०० ते १२०
घेवडा ७० ते ८० १०० ते १२०
ढोबळी मिरची ६० ते ७० ८० ते ९०
पडवळ ५० ते ६० ८० ते ९०
शेवगा शेंग ८० ते ९० १०० ते १२०
सुरण ५० ते ६० ८० ते ९०
तोंडली ५० ते ६० ८० ते ९०
हिरवा मटार -१२० ते १५० १८० ते २००
वालवड -७० ते ८० १०० ते १२०
हिरवी मिरची ७० ते ८० १०० ते १२०
किलोऐवजी पावकिलो खरेदी
भाज्यांची आवक कमी झाल्याने, किरकोळ बाजारात असलेले भाज्यांचे दर घाऊक बाजारात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात, तर विक्रेते किलोचा नाही तर पावच किलोचा भाव सांगत आहेत. वाढलेले दर पाहूनही, एक किलो भाजी घेणारे ग्राहकही अर्धा किलो खरेदी करीत आहेत.
हिरवा मसालाही महाग
हिरव्या मिरचीबरोबर कोथिंबीरही महागली आहे. सगळ्याचे दर वाढल्याने आता बाजारात दहा रुपयांना मिळणार हिरवा मसाला मिळणे बंद झाले आहे. हिरव्या मसाल्यासाठी दहाच्या जागी आता वीस रुपये मोजावे लागत आहेत. त्यातही नेहमीपेक्षा निम्माच हिरवा मसाला येत आहे.