वाखनखे जुलैमध्ये येणार
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वीच ब्रिटनसोबत सामंजस्य करार केला होता. चार जूनला वाघनखे भारतात येणे अपेक्षित होते. मात्र, आचारसंहितेमुळे त्यात अडथळे आले. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आली असून, ही वाघनखे भारतात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच या संदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
वाघनखे कुठे ठेवणार?
– वाघनखे सातारा, कोल्हापूर आणि नागपूर येथील संग्रहालयांत एक-एक वर्षासाठी ठेवण्याचे नियोजन
– वाघनखे लंडनहून मुंबई आणि तेथून थेट साताऱ्यात नेली जातील.
– वाघनखांसाठी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात विशेष दालन तयार केले आहे.