बॉयफ्रेंडसोबत बिर्याणी खायला रेस्टॉरंटमध्ये गेली अन् घात झाला…

चिकन बिर्याणीImage Credit source: प्रातिनिधिक फोटो

बिर्याणी खायला अनेकांना आवडतं चिकन. मटण बिर्याणीचे बरेच लोक शौकीन असतात, पण ती खाताना काळजी घ्यावी लागते, कारण ते पीसेस घशात अडकून त्रास होण्याची शक्यता असते. असाच काहीस प्रकार पालघरमध्ये घडला. तेथे एक मुलगी तिच्या बॉयफ्रेंड सोबत बिर्याणी खाण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेली पण तिथेच तिचा घात झाला. जेवत असतानाच असं काही घडलं ज्यामुळे तिला जीव गमावावा लागला. बिर्याणी खाताना त्या तरूणीच्या घशात चिकनचा एक पीस अडकला आणि त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. पाहता पाहता परिस्थिती बरीच बिघडली, ते पाहून त्या तरूणीला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं खरं, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. रुग्णालयात उपचार होण्यापूर्वीच त्या तरूणीचा मृत्य झाला. या दुर्दैवी घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली असून तरूणीचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ती मुलगी तिच्या प्रियकरासोबत एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती. दोघांनी तिथे बिर्याणी ऑर्डर केली. त्यांनी खूप आनंदाने बिर्याणी खाल्ली. पण त्याच दरम्यान, बिर्याणी खाताना, मुलीच्या घशात चिकनचा तुकडा अडकला आणि तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. चिकनचा तो पीस बराच वेळ मुलीच्या घशात अडकला होता. त्यामुळे ती जागीच बेशुद्ध पडली.

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच घेतला अखेरचा श्वास

ते पाहून आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने त्या तरूणीला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. पण मुलीची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी पाठवला. मुलीच्या मृत्यूची बातम ऐकून कुटुंबियांवर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला आणि ते शोकाकुल झाले.

पोलीस पाहतायत पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट

ती मृत मुलगी 27 वर्षांची होती. आता अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, पोस्टमॉर्टेम रिपोर्टचीही वाट पाहत आहोत, असे पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी याप्रकरणी सांगितलं. चिकनचा पीस घशात अडकल्याने मुलीचा मृत्यू झाला की त्यामागे काही कट होता हे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यावरच स्पष्ट होईल. यासोबतच, कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झाला आहे का, याचाही तपास पोलिस करत आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)