Chhagan Bhujbal : तर भुजबळ तिसरे उपमुख्यमंत्री…गिरीश महाजनांचा जबरी टोला, आताच धुसफूस चव्हाट्यावर?

गिरीश महाजन, छगन भुजबळImage Credit source: गुगल

राज्य सरकार सत्तेत आल्यानंतर हेवीवेट नेते छगन भुजबळ यांना सहा महिन्यांनी मंत्री पद मिळाले. सत्तेत असूनही पद नसल्याने भुजबळ नाराज होते. त्यांनी शेरो शायरीतून ही नाराजी वारंवार व्यक्त केली होती. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. त्यावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया पण आल्या. महायुतीतील घटक पक्ष भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी भविष्यातील धुसफुसीचे संकेत आताच दिले आहेत.

तर ते तिसरे उपमुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपल्याला मंत्रिपद मिळाल्याचे भुजबळ म्हणाले होते. त्यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांचे शिवाय होणारच नाही. पालकमंत्री पदावर दावा करणं काय वाईट आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर ते अजून काही होऊ शकतात…तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात, असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांना लगावला आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून प्रश्न विचारल्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे कुणाला पालकमंत्री करायचं कुणाला मंत्री करायचं. असं कोणी काही म्हटलेलं नाहीये, तुम्ही पत्रकार फक्त त्यामध्ये तेल टाकू नका. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा असणे काय चुकीचा आहे? चांगलं आहे. ते तर म्हणत असतील की मी होणार आहे तर ते दावा करू शकतात चांगले आहे स्वागत आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तेथे सुद्धा त्यांना करू शकतात, असे महाजन म्हणाले.

लाडक्या बहिणीमुळे तिजोरीवर बोजा

लाडक्या बहिणीमुळे सरकारच्या तिजोरीवर 40-50 हजार कोटींचा खर्च वाढला आहे, असे भुजबळ म्हणाले. त्यावर ही महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. हे लिखितच आहे. यात त्यांनी काय नवीन सांगितलं. हा काही गौप्यस्फोट आहे का? असा टोला महाजनांनी हाणला. जवळपास 30 हजार कोटी खर्च हा त्यामुळे वाढलेला आहे. असे ते म्हणाले.

लाडकी बहीण योजनेतही निधी वळवण्याबत त्यांनी मत व्यक्त केले. याबाबत यापूर्वी अर्थमंत्र्यांनी याबाबत खुलासा केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे. बंधित खात्याच्या मंत्र्यांनी देखील याबाबत खुलासा केला आहे. ला वाटतं लाडक्या बहिणीचे पैसे देणं क्रमप्राप्त आहे. त्र कुठलाही निधी नियमबाह्य वळणार नाही हे सुद्धा बघायचं आहे. मला वाटतं नियमांमध्ये राहून सर्व काम होतील. नियमात राहून सर्व काम चाललेले आहे कुठल्याही पद्धतीने अशी पळवा पळवी होणार नाही.दिला असेल तर तो तात्पुरता असेल तो पुन्हा आहे त्या विभागात वळविण्यात येईल. मला वाटतं कोणत्याही खात्यावर अन्याय होणार नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)