25 May 2025 09:33 AM (IST)
विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चंदन उटी पूजेतून मंदिर समितीला 14 लाख रुपयांचं उत्पन्न
पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मूर्तीच्या चंदन उटी पूजेतून मंदिर समितीला 14 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी ही माहिती दिली. गुढीपाडव्या दिवशी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची चंदन उटी पूजेची सुरुवात झाली तर त्याची सांगता 13 जूनला होणार आहे.
30 मार्च ते 12 जून दरम्याच्या 43 दिवसांमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चंदन उटी पूजेसाठी 53 किलो चंदनाचा वापर करण्यात आला असून मंदिर समितीला 14 लाख रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालं आहे.
25 May 2025 09:22 AM (IST)
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे, अमेरिका, चीन, जर्मनीनंतर भारत चौथ्या क्रमांकावर असल्याची माहिती निती आयोगाचे सीईओ सुब्रमण्यम यांनी दिली. भारताने जपानला मागे टाकत चौथं स्थान मिळवलंय.
25 May 2025 09:20 AM (IST)
ठाण्यातील घोडबंदर भागात पाणी साचू नये यासाठी उपाययोजना
ठाण्यातील घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणात एमएमआरडीए ,एमएसआरडीसी, मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची कामं सुरू आहेत. यंदा घोडबंदर रोड पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याची धास्ती घेत पालिका प्रशासनाने कापूरबावडी ते गायमुखपर्यंत दोन्ही मार्गिकांवर पाणी साचून नये यासाठी लक्ष ठेवण्यासाठी पालिकेच्या ७ अभियंत्यांची नेमणूक केल्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोड यांनी काढले आहे.
25 May 2025 09:18 AM (IST)
पुणे- मंगळवार पेठेत पहाटे गोळीबाराची घटना
पुणे- मंगळवार पेठेत पहाटे गोळीबाराची घटना घडली आहे. भीमनगर कमानीजवळ रोहीत माने याने हा गोळीबार केल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून पिस्तूल आणि काडतूसं जप्त करण्यात आले आहेत. तर त्याचा साथीदार कासीम अन्सारी याला देखील ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
25 May 2025 09:17 AM (IST)
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी दोन भावंड आणि एका मैत्रिणीचा जबाब नोंदवला
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात वैष्णवीचे दोन भाऊ विराज आणि पृथ्वीराज तसंच एक मैत्रीण असे एकूण तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तसंच स्त्रीधन म्हणून वैष्णवीला दिलेली चांदीची भांडी (पाच ताटं,पाच तांबे, चार वाट्या, एक करंडा, एक अधिक महिन्यात दिलेले चांदीचं ताट) जप्त करण्यात आले आहेत. आरोपी सुशील हगवणे आणि शशांक हागवणे यांच्याकडे परवानाधारक शस्त्र असल्याने ते दोन्ही शस्त्र जप्त करण्यात आले आहेत.
25 May 2025 09:15 AM (IST)
राज्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, तापमानात घट
मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण असून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असून पावसाचा आनंद घेण्यासाठी नरिमन पॉईंट परिसरात समुद्रकिनारी अनेक मुंबईकर भिजत, सेल्फी घेत वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी जमले आहेत.