आजकाल प्रत्येकाला आपली त्वचा ही फ्रेश आणि चमकदार दिसावी असे वाटत असते. यासाठी बाजारात अनेक प्रोडक्ट आहेत. परंतू त्यात असलेले कॅमिकल कालांतराने त्वचेच्या अनेक समस्या निर्माण करतात. अशातच तूम्हाला जर घरगुती उपाय करायचा असेल तर तुम्ही यासाठी आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असलेल्या कोथिंबीरीचा वापर करू शकता. स्वयंपाक घरात असणारी कोथिंबीर खूपच औषधी तर आहेच परंतू आपल्या त्वचेचा हेल्दी आणि चमकदार बनविण्यासाठी तिचा वापर केला जातो. त्यात कोथिंबीर आपण भाज्यांपासून ते पेयांपर्यंत बहुतेक पदार्थांमध्ये वापरली जाते, त्यामुळे त्यांची चवही वाढते. पण तुम्हाला माहिती आहे का की ते आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठीही खुप फायदेशीर आहे. तुमची त्वचा चमकदार करण्यासाठी तुम्ही याचा वापर देखील करू शकता. कारण या कोथिंबीरीत मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर, लोह, व्हिटॅमिन सी आणि ए सारखे पोषक घटक आढळतात.
हिरव्या कोथिंबीरच्या पानांमध्ये थंडावा असतो. अशा परिस्थितीत ते त्वचेला थंड करण्यास देखील मदत करते. हिरव्या कोथिंबीरची पाने त्वचेच्या काळजीसाठी अनेक प्रकारे वापरली जाऊ शकतात. चला तर मग आजच्या या लेखात त्याबद्दल जाणून घेऊया.
कोथिंबीरच्या पानांपासून तुमच्या त्वचेला मिळतील हे फायदे
हिरव्या कोथिंबीरची पाने त्वचा मऊ करण्यास मदत करू शकतात. त्यात व्हिटॅमिन सी आढळते, जे डाग कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच, त्यात असलेले अँटी-एजिंग गुणधर्म त्वचा घट्ट ठेवण्यास मदत करू शकतात आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुरुम कमी करण्यास मदत करू शकतात. तसेच त्वचा हायड्रेटेड राहते.
कोथिंबीरच्या पानांपासून टोनर बनवा
कोथिंबीरीची पाने स्वच्छ करून वेगळी करा. आता गॅसवर एक पॅन ठेवा, त्यात पाणी आणि कोथिंबीर टाका आणि हे पाणी उकळवा. आता हे पाणी थंड झाल्यावर एका बाटलीत गाळून भरा. तुमचा कोथिंबीरच्या पानांपासून त्वचेची काळजी घेणारा नैसर्गिक टोनर तयार आहे. तुम्ही हे पाणी टोनर म्हणून वापरू शकता किंवा या पाण्याने तुमचा चेहरा धुवू शकता.
कोरफड जेल आणि कोथिंबीरीची पाने
कोथिंबीरची पाने बारीक करून मऊ पेस्ट बनवा. आता त्यात कोरफडीचे जेल टाका. ही पेस्ट चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. उन्हाळ्यात त्वचेला ताजेतवाने आणि थंडावा देण्यास ही पेस्ट मदत करू शकते. हे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास देखील मदत करते.
फेस पॅक
मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीरची पाने टाका आणि मऊ पेस्ट तयार करा. यानंतर, एका भांड्यात थोडे पाणी घ्या, त्यात कडुलिंबाची पाने टाकून ते पाणी उकळवा. आता हे पाणी थंड होऊ द्या. थंड झाल्यावर त्यात कोथिंबीरची पेस्ट टाकून चांगले मिक्स करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे लावल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. आठवड्यातून एक किंवा दोनदा हा फेसपॅक तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता, त्यापेक्षा जास्त वेळा हा फेस पॅक वापरू नका. पहिल्यांदा वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)