फर्स्ट संडे व टेक्नोव्हेटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उपक्रमांतर्गत “सृजन – २०२५” – “बिल्डिंग सस्टेनेबल इकोसिस्टम” या परिसंवादाचे पुण्यात १ जून रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. इन्क्युबेट पार्टनर्स या परिसंवादाचे मेंटॉर आहेत. फूड, एनर्जी, वॉटर, टेक्नॉलॉजी व सोशल इम्पॅक्ट क्षेत्रातील आव्हाने, संधी व उपाय याबाबत या परिसंवादात पाच पॅनेल्स मध्ये दिवसभर चर्चा होणार आहे. ठिकाण फिरोदिया सभागृह, इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर बिल्डिंग, शिवाजीनगर आहे. परिसंवादात सामील होण्याची फीस फक्त तीनशे पन्नास रुपये इतकी कमी ठेवण्यात आली आहे.
अन्न, ऊर्जा, पाणी, तंत्रज्ञान व सामाजिक उपक्रम हे पाच क्षेत्र एकमेकांशी जवळून निगडित आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत. आपल्या दररोजच्या जीवनात या पाचही क्षेत्रातील नवीन संशोधन, नवीन उत्पादने, नवीन आव्हाने यामुळे आमूलाग्र बदल होत आहेत. सध्या होत असलेला विकास शाश्वत विकास आहे का याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे, म्हणून या परिसंवादाचे आयोजन केले आहे असे या परिसंवादाचे निमंत्रक व आयोजक डॉ संदीप कडवे यांनी सांगितले. या परिसंवादाला उद्योगपती डॉ अरुण फिरोदिया, आयशर च्या गव्हर्निंग बोर्ड चे चेअरमन डॉ अरविंद नातू, डॉ के सी मोहिते, डॉ पंडित विद्यासागर, श्री बाळ पाटील, श्री उमेश कुलकर्णी, श्री निलेश इनामदार, डॉ सतीश खाडे, श्री मयूर बागुल, डॉ हेरॉल्ड डिकॉस्ता, डॉ बी बी काळे व अनेक मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. परिसंवादाला नवउद्योजक, संशोधक, प्रमुख उद्योजक, विद्यार्थी, फर्स्ट संडे उपक्रमाचे अनेक मेम्बर्स, विविध कंपन्यांचे अधिकारी, गुंतवणूकदार, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच प्रयोजकांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सृजन २०२५ च्या निमित्ताने या पाच क्षेत्रातील अनेक प्रश्नांची चर्चा होऊन त्यावर उपाययोजना सुचवल्या जातील, तसेच नवीन उद्योगांच्या संधी दृष्टीपथात येतील अशी आयोजकांची अपेक्षा आहे.
फर्स्ट संडे हा सामाजिक उपक्रम २०२१ पासून पुण्यात सुरु झाला. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी साडेआठ ते साडेदहा या वेळेत प्रत्यक्ष भेटीचे उद्दिष्ट ठेवून हा उपक्रम डॉ संदीप कडवे व डॉ के सी मोहिते यांनी सुरु केला. गेल्या चार वर्षात ४५ मासिक मिटींग्स अखंडरीत्या आयोजित करून या उपक्रमाचे सातत्य टिकवले असून एकशे वीस पेक्षा जास्त मेंबर्स नियमितपणे या मिटींग्स ना हजेरी लावून नेटवर्किंग, उद्यमशीलता, तंत्रज्ञान, सामाजिक क्षेत्र, शाश्वत विकास, इनोव्हेशन या क्षेत्रात एकत्र काम करीत आहेत.
————————-
संपर्क :
डॉ संदीप कडवे – आयोजक व निमंत्रक – सृजन २०२५ परिसंवाद
मोबाईल ९८६०६७८८४४ | मोबाईल 9860678844
इमेल – mentor@in3bet.com