हुंड्यासाठी सुनांचा छळ करून, त्यांना मारहाण करून राबवणाऱ्या, अगदी जीव देईपर्यंत छळणार हगवणे कुटुंबियांच्या क्रूर कारनाम्यांचे एकेक अपडेट्स समोर येत असून त्याने अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. वैष्णवी हगवणे प्रमाणेच त्यांची मोठी सून मयुरी हिचाही खूप छळ झाला, मारहाण झाली. मात्र तिने ते सहन न करता पोलीस तक्रार केली आणि घरही सोडलं म्हणून ती आज जिवत तरी आहे. हे प्रकरण सर्वांनीच उचलून धरले असून दोषींना कठोरात कठोर सिक्षा होईल असे आश्वासन सरकारतर्फे वैष्णवीच्या आई-वडिलांना देण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलीस तपासातूनही नवनवे खुलासे होत असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या देखील याप्रकरणाचा कसून पाठपुराव करत आहेत.
हगवणे कुटुंबियांचे अत्याचर आणि दोन्ही सुनांवर काय परिस्थिती ओढवली होकी,याबाबत बोलत दमानिया यांनी प्रतिक्रियाही दिली. मयुरी जगतापच्या आईने जे पत्र लिहीलं, त्याचे काही फोटोही दमानियांनी ट्विट केले होते. त्याबद्दलही त्या बोलल्या. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. मयुरी ही विनाकारण आरोप करणार नाही, मयुरीच्या आईने, जे पत्र महिला आयोगाला लिहिले होते त्यात असेही लिहिले आहे, की राजेंद्र हगवणे यांनी सुद्धा मयुरीला एकदा थप्पड मारली होती. तिचे कपडे फाडले होते. आणि मयुरीच्या दिराने, शशांकनेही असं काही केलं असेल तर ते अतिशय गंभीर आहे. हगवणे हे केवळ लोभी नाही तर विकृत कुटुंब आहे अशी टीका दमानिया यांनी केली.
तसेच या कुटुंबाला राजकीय साथही होती. आणि त्यांचे मामा जालिंदर सुपेकर त्यांची पण साथ होती असे म्हणत याचा मोठा खुलासा मी थोड्यावेळात करणार आहे, याची माहिती मागवली आहे,असे दमानिया म्हणाल्या.
निलेश चव्हाण कडे जे गन लायसन्स होते तेसुद्धा जालिंदर सुपेकर ने दिले होते, अशी बातमी काही माध्यमांनी चालववी. निलेश चव्हाणला जालिंदर सुपेकरने जी मदत केली ते अतिशय शौकीन आहेत. असे अधिकारी निलेश चव्हाण सारख्या माणसाला मदत करतात म्हणून वैष्णवीला प्राण गमवावे लागतात असा आरोप करत या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी दमानियांनी केली.
सोमवारी महिला आयोगाची भेट घेणार
येत्या सोमवारी मी महिला आयोगाला भेटून चर्चा करणार आहे. महिला आयोगात अनेक गोष्टीत बदल आणण्याची गरज आहे, असे दमानिया म्हणाल्या. महिला आयोगाला महिलेने तक्रार करताना ईमेल पाठवावी लागत त्यावर महिला आयोग उत्तर देतं, पण मग ग्रामीण भागातील महिला कुठून ईमेल बघणार असा सवालही त्यांनी विचारला.
हगवणे प्रकरणात जसजसे खुलासे होत चाललेत तसे खात्री पटत चालली की, यंत्रणा खूप सक्षम होणे गरजेचे आहे. आता राजकीय, पोलीस, मोठे मानस, पुरुष हे दबाव आता बंद करण्याची गरज आहे, अशी भावना अंजली दमानिया यांनी व्यक्त केल्या आहेत.