Karuna Munde : त्या सुंदर दिसतात म्हणून…, वादात करुणा मुंडेंची उडी, आरोपांच्या अशा उडवल्या फैरी

करुणा मुंडे, रुपाली चाकणकरImage Credit source: गुगल

पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्याप्रकरणात राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आयोगाच्या भूमिकेवर चौफेर टीका होत आहे. रोहिणी खडसे यांनी तर अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्ज केला आहे. तर या वादात आता करुणा शर्मा-मुंडे या पण हिरारीने उतरल्या आहेत. त्यांनी महिला आयोगाच्या कारभारावर तुफान हल्लाबोल चढवला. चाकणकर यांच्या चिल्लर या प्रतिक्रियेचा त्यांनी खरमरीत समाचार घेतला.

किती महिलांना दिला न्याय?

महिला आयोगाकडे 901 महिलांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यातील किती महिलांना न्याय दिला, असा सवाल करुणा शर्मा-मुंडे यांनी चाकणकर यांना केला. पक्षासाठी फिरण हे रुपाली चाकणकर यांचे काम नाही तर महिला आयोगाकडे येणार्‍या तक्रारींना न्याय देणं हे काम आहे, असा टोला ही त्यांनी चाकणकरांना लगावला.

त्यांना तर माज

चाकणकरांच्या चिल्लर या शब्दावर सुद्धा त्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. त्यांच्यावर हल्लाबोल चढवला. रुपाली चाकणकर यांना माज आहे म्हणून चिल्लर असा शब्द त्यांच्याकडून वापरला जातो, अशी टीका करुणा मुंडे यांनी केली. चिल्लर … या रुपाली चाकणकर यांनी उल्लेख केलेल्या शब्दावर, करुणा शर्मा मुंडे यांनी जोरदार हल्ला चढवला.

त्या सुंदर म्हणून महिला आयोगाचे अध्यक्षपद

महाराष्ट्रात वैष्णवी, पूजा चव्हाण, करुणा, या अशा घरोघरी आहेत, असे त्या म्हणाल्या. महिला आयोगाकडे तक्रार दाखल करूनही काही कारवाई न झालेल्या दोन पीडित महिला पण यावेळी करुणा शर्मा मुंडे यांच्यासोबत होत्या. रुपाली चाकणकर यांनी पीडित महिलांना दिला नाही तर तक्रार देणार्‍या 35 हजार महिलांसोबत महिला आयोगाबाहेर आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला.

फक्त सुंदर दिसतात म्हणून महिला आयोगाचे,रुपाली चाकणकर यांना पद दिल्याचा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी महिला आयोगाचे पद नाही, रुपाली चाकणकर यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली.

न्याय मिळाला नाही

पोलीस, प्रशासन, महिला आयोग यांच्याकडे अनेक चकरा मारूनही न्याय मिळत नसल्याने,आम्हीही आता आत्महत्या करावी का ? असा सवाल काही महिलांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे करुणा शर्मा मुंडे यांच्यासोबत असलेल्या या महिलांनी,रुपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत तीव्र आक्षेप घेत राजीनाम्याची मागणी केली आहे. करुणा शर्मासह या पीडित महिलांनी हे आरोप केले आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)