Vaishnavi Hagawane: 51 तोळे सोनं, चांदीची भांडी, फॉर्च्युनर कार, अनेक महागड्या वस्तू दिल्यानंतर देखील वैष्णवी हिने आत्महत्या केली. आता वैष्णवी हिने आत्महत्या केली की, सासरच्यांची तिची हत्या केली? यावर पोलीस चौकशी सध्या सुरु आहे. तर वैष्णवी हिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या आई – वडिलांनी सासरच्या मंडळींवर लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती, सासू, नणंद, सासरे यांच्या छळामुळे कंटाळून अवघ्या 23 वर्षांच्या वैष्णवीने 9 महिन्यांच्या लगहान मुलाला मागे सोडत आत्महत्या केली. हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी नवरा शशांक सासू लता आणि नणंद मयूरी, सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना अटक केली आहे.
वैष्णवी प्रकरणानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी देखील प्रकरणावर स्वतःचं मत मांडलं आहे. यामध्ये अभिनेत्याने वैष्णवी हिचे आई – वडील देखील जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. सध्या सर्वत्र प्रकरणाची चर्चा सुरु आहे.
वैष्णवी कस्पटे (मुळ नाव) आणि तेच वापरावं! ज्या आडनावाने तिचा बळी घेतला ते नकोच!
या आपल्या बहिणीचा आजच्या काळात हुंडाबळी गेलाय! गेली अनेक वर्ष तिचा छळ झालांय…
चूक दोन्ही बाजूची आहे… सासरकडच्यांची आणि हुंडा देणाऱ्या आईबापाची सुद्धा!
लवकरात लवकर कठीण कारवाई झाली पाहिजे आणि…
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) May 22, 2025
अभिनेता म्हणाला, ‘वैष्णवी कस्पटे (मुळ नाव) आणि तेच वापरावं! ज्या आडनावाने तिचा बळी घेतला ते नकोच! या आपल्या बहिणीचा आजच्या काळात हुंडाबळी गेलाय! गेली अनेक वर्ष तिचा छळ झालांय… चूक दोन्ही बाजूची आहे… सासरकडच्यांची आणि हुंडा देणाऱ्या आईबापाची सुद्धा! लवकरात लवकर कठीण कारवाई झाली पाहिजे आणि यापुढे आपल्या महाराष्ट्रात तरी अशा घटना होऊ नयेत म्हणून आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे… ‘
हेमंत याच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘छळाकडे डोळेझाक करून तीचा so called संसार वाचवण्यापेक्षा वेळेवर निर्णय घेतला असता तर पोरगी वाचली असती.’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘नवरा आणि सासरा, फाशीपेक्षा कमी शिक्षा नको..’, ‘आई बाबाची चूक म्हणणे सोपं आहे पण आपल्या लेकरासाठी तोंड बंद ठेवून लाथा बुक्क्यांचा मार सगळे आई बाप सहन करतात, तरी पण तुम्ही चूक म्हणा पण आईबाबा ने गुन्हा नाही केला. गुन्हा नवरा, सासरा आणि बाकीचे…’
मिळालेल्या माहितीनुसार, शवविच्छेदनादरम्यान वैष्णवीच्या शरीरावर अनेक जखमा दिसून आल्या आहेत. शिवाय वैष्णवी हिला वेगवेगळ्या हत्यारांनी मारल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं आहे. बावधन पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक केल्यानंतर स्टेशन डायरी नोंद केली.