राजेंद्र आणि सुशील पळाले कुठे?Image Credit source: गुगल
वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा आरोप असणारे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील अजूनही फरार आहेत. हगवणे यांच्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर तिच्या वडिलांनी, सासरकडील मंडळीने तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप केला आहे. शवविच्छेदन अहवालात तिला मारहाण झाल्याचे समोर येत आहे. आता हे पित्रा-पूत्र कुठे लपले आहेत, पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी काय केले? काय आहे अपडेट?
दोघे जण फरार
राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा सुशील हगवणे हे दोघे आता फरार आहेत. दोन्ही आरोपींना शोधण्यासाठी बावधन पोलिसांची दोन पथके परराज्यात गेल्याची माहिती समोर येत आहे. तर मयत वैष्णवी यांचं 10 महिन्याचे चिमुकले बाळ ज्या निलेश चव्हाण नामक व्यक्तीकडे होतं त्याने ते बाळ हगवणे कुटुंबीयांकडे सुपूर्द केल्याची माहिती पण समोर येत आहे. बाळ आमच्या मुलीचे आहे आणि मागील सात दिवसांपासून त्याचे आई विना प्रचंड हाल होत असल्याने ते घेण्यासाठी आम्ही आज हगवणे कुटुंबीयांकडे जाणार असल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलं होते. पण थोड्याच वेळापूर्वी हे गोड बाळ कसपटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
दरम्यान फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा सुशील हगवणे हे कुठे लपून बसले त्याच बरोबर हुंड्यात घेतलेले 51 तोळे सोने गहाण ठेऊन त्या पैशाचे काय केलं? या बाबत अटक असलेले सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे या तीनही आरोपींच्या पोलीस कोठडीत 26 मे पर्यंत वाढ करण्यात आली असून, बावधन पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
सुशील हगवणे हाच पीडित
दरम्यान सुशील हगवणे याची पत्नी आणि या घरातील मोठी सून मयुरी हगवणे ही सुद्धा प्रसार माध्यमांसमोर आली आहे. सासू, दीर, नणंद हे आपल्या पतीला, सुशील याला घालून पाडून बोलत असत. त्याला मारहाण करत असत, असा आरोप केला आहे. सुशील हगवणे हाच पीडित असल्याचा दावा तिने केला आहे. तिचे आणि सुशीलचा प्रेम विवाह झाला आहे. पण गेल्या दीड वर्षांपासून ती हगवणेंच्या घरातच वेगळी राहत असल्याची ती म्हणाली. तर सासू, नणंद आणि दिराने मारहाण केल्यानंतर ती तिच्या माहेरी आली. तिने याप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
राजेंद्र हगवणे यांची हकालपट्टी
राजेंद्र हागवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिली. सगळ्या पदावरून त्यांना काढून टाकण्यात आला आहे. जी घटना त्यांच्या घरात घडली ती मानवतेला काळीमा फासणारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या प्रवृत्तीचा निषेध करते, असे ते म्हणाले.