लेकाने एकाला संपवलं, ऐकताच माऊली खचली, धक्का सहन न झाल्याने आईनेही जीव दिला, सांगली हादरलं

Sangli Crime News: सांगलीत उधारीच्या पैशाच्या वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणातील आरोपींना काहीच तासात अटक केली. मात्र, आपल्या मुलाने कोणाची हत्या केल्याचं कळताच आईनेही आपला जीव दिला आहे.

(फोटोLipi)

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: उसनवार दिलेल्या पैशाची मागणी करत असलेला राग मनात धरून कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे अजित उर्फ संजय कृष्णा क्षीरसागर यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. अवघ्या आठ तासातच कवठेमहांकाळ पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली. दरम्यान, आरोपी मुलगा सुशांत शेजुळ याने केलेल्या खूनाचा धक्का सहन न झाल्याने आरोपीची आई विमल शंकर शेजुळ यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे.

खून करणाऱ्या सुशांत शेजुळ आणि स्वप्निल क्षीरसागर यांना पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी (18 मे) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अजित क्षीरसागर हे दुकान साहित्य आणण्यासाठी घरातून निघाले होते. रात्री उशीर झाला तरी ते परत आले नाहीत. घरातील सदस्यांनी त्यांची इतरत्र शोधाशोध केली मात्र ते मिळून आले नाहीत.

मंगळवारी (20 मे) दुपारी गावातील मारुती कारंडे हायस्कूलच्या पाठीमागे अजित क्षीरसागर हे जखमी अवस्थेत पडले असल्याचे नागरिकांनी सांगितले. यावेळी घरातील सदस्यांनी जाऊन पाहणी केली असता क्षीरसागर हे जखमी अवस्थेत पडले होते.
Crime Diary: शू लेसने जीव घेतला, सुटकेसमध्ये बॉडी भरली, कॅबने फिरला अन्… मॉडल मानसीची थरारक कहाणी

नेमकं काय घडलं?

रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी व जखमी बसले होते. सुशांत शेजुळ यास उसनवार दिलेले 2 हजार रुपये परत मागितले. पैसे मागितल्याचा राग मनात धरून सुशांत शेजुळ व स्वप्निल क्षीरसागर अजित क्षीरसागर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले.

सुशांत याने डोकीत दगड घातला तर स्वप्निल याने पायावर दगड मारून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत अजित यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान अजित क्षीरसागर यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून संशयित दोघांना अटक केली आहे. दरम्यान, अजित क्षीरसागर यांच्या खूनप्रकरणी सुशांत शेजुळ यांचे नाव आल्यानंतर या घटनेचा धक्का त्याच्या आईला बसला. आपल्या मुलाच्या कृत्याने त्याची आई विमल शंकर शेजुळ यांनी राहत्या घरी आपले जीवन संपवले. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडाआणखी वाचा

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)