त्वचा व मेंदूसाठी आवश्यक ओमेगा-3 फॅटी ॲसिड, तज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे करा सेवन

आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपण आपल्या आहारात अनेक बदल करत असतो. तसेच आरोग्य तंदुरस्त राहण्यासाठी अनेक प्रकारचे पोषक तत्वे, जीवनसत्त्वे आणि खनिजे आवश्यक असतात. ज्यापासून शरीराला ऊर्जा मिळते. ओमेगा-3 फॅटी ॲसिड हे शरीरासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांपैकी एक आहे. जे शरीराच्या वेगवेगळ्या कार्यांसाठी आवश्यक असते. ओमेगा-3 फॅटी ॲसिडबद्दल, लोकांचा असा विश्वास आहे की हे केवळ जास्त करून मांसाहारी पदार्थांमध्ये, विशेषतः माशांमध्ये आढळते. पण असं नाहीये तर हे ओमेगा-३ फॅटी ॲसिड अनेक शाकाहारी पदार्थांमध्येही आढळतं. ज्याबद्दल काही लोकांना खूप कमी माहिती आहे.

ओमेगा-3 फॅटी ॲसिड त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी तसेच मेंदू आणि हृदयासाठी खूप फायदेशीर
ठरते. ओमेगा-3 फॅटी ॲसिड आपल्यासाठी का महत्त्वाचे आहे, शरीरात त्याची कमतरता असल्यास कोणत्या प्रकारची लक्षणे दिसतात आणि कोणत्या शाकाहारी पदार्थांमध्ये ते मुबलक प्रमाणात आढळते हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड शरीरासाठी का महत्त्वाचे आहेत?

अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील कन्सल्टंट जनरल फिजिशियन डॉ. अंकित पटेल सांगतात की ओमेगा-3 फॅटी ॲसिड हे एक आवश्यक पोषक तत्व आहे. कारण हे असे पोषक तत्व आहे जे आपले शरीर स्वतः तयार करू शकत नाही, म्हणून आपल्याला ते अन्नाद्वारे सेवन करावे लागते. ओमेगा-3 फॅटी ॲसिड हे आपले मेंदू, हृदय, डोळे आणि सांधे निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी ओमेगा-3 फॅटी ॲसिड देखील आवश्यक आहेत; ते वृद्धत्व रोखण्यास मदत करतात. जर शरीरात ओमेगा-3 फॅटी ॲसिडची कमतरता असेल तर कमकुवत स्मरणशक्ती, चिडचिडेपणा, कोरडी आणि खराब झालेली त्वचा अशी लक्षणे दिसू शकतात. दृष्टी कमकुवत होऊ शकते आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. मुलांमध्ये त्याची कमतरता मानसिक विकासात अडथळा आणू शकते.

तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

ओमेगा-3 चे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत: एALA, EPA आणि DHA. शाकाहारी पदार्थांबद्दल बोलायचे झाले तर ओमेगा-3 फॅटी ॲसिड चिया बिया, अक्रोड, सोयाबीन, कॅनोला तेल आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये आढळते. यामध्ये ALA असते, जे शरीरात मर्यादित प्रमाणात DHA आणि EPA मध्ये रूपांतरित होते, जे शरीरासाठी अधिक प्रभावी असतात.

अंडी आणि काही दुग्धजन्य पदार्थांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड कमी प्रमाणात आढळते. शाकाहारी लोकांसाठी, अल्गी तेल सारखे पूरक आहार हा एक चांगला पर्याय आहे. म्हणून, शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहण्यासाठी आणि तुम्ही निरोगी राहण्यासाठी तुमच्या आहारात ओमेगा-3 समृद्ध असलेले पदार्थ समाविष्ट करणे महत्वाचे आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)