मेहंदीचा रंग जास्त गडद होईल, फक्त ‘या’ 5 सोप्या टिप्स करा फॉलो

सध्या सर्वत्र लग्नसराई सुरू आहे. अशातच प्रत्येक महिला व मुली आपल्या हातावर मेहंदी काढतात. यात मेहंदीचा रंग हवा तसा गडद नसेल तर हातांवर मेहंदी लावण्यात काही मजा नाही. विशेषतः प्रत्येक वधूला तिच्या लग्नात असे वाटते की सुंदर मेहंदी डिझाइनचा रंग इतका गडद असावा की प्रत्येकजण त्याकडे पाहतच राहील. आजकाल बाजारात अशी मेंदी उपलब्ध आहे ज्याचा रंग लवकर गडद होतो, परंतु तरीही, कधीकधी काही लोकांच्या हातावर मेंदी खूप फिकट दिसते. याबद्दल काळजी करण्याची आता गरज नाही. काही घरगुती उपाय आहेत जे खूप सोपे आहेत आणि मेहंदींचा रंग कमी वेळात गडद होतो. लग्नाचे दिवस आहे, जर तुम्ही वधू होणार असाल तर या टिप्स नक्कीच वाचा.

भारतीय परंपरेनुसार लग्नाच्या एक दिवस आधी, वधू-वरांसह कुटुंबातील बहुतेक सदस्य त्यांच्या हातांवर मेहंदी काढतात. याशिवाय, विशेष शुभ प्रसंगी मेहंदी देखील काढली जाते. मेहंदी चांगली काढली की डिझाइन छान दिसते आणि हात खूप सुंदर दिसतात. या लेखात मेहंदीचा रंग गडद करण्यासाठी उपयुक्त असलेल्या काही सोप्या टिप्स आपण जाणून घेऊयात…

लवंग मेहंदी काळी करण्यास उपयुक्त

मेहंदीचा रंग गडद करण्यासाठी लवंग खूप उपयुक्त ठरू शकते. जेव्हा मेहंदी सुकते आणि तुम्ही ती काढता तेव्हा एका तव्यावर ८-९ लवंगा भाजून घ्या आणि त्याचा धूर हातावर घ्या. यामुळे मेहंदीचा रंग थोड्याच वेळात गडद होईल. लवंगाचे तेल लावल्याने मेहंदीही गडद होते.

लिंबू आणि साखरेचे पाक

मेहंदी सुकताच ती लगेच निघू लागते आणि त्यामुळे तिचा रंग फिका पडू शकतो. यासाठी लिंबाच्या रसात थोडे पाणी मिसळा आणि त्यात साखर टाका आणि चिकट जाड पाक तयार करा. मेहंदी सुकल्यानंतर कापसाच्या मदतीने हळूवारपणे मेहंदीवर लावा. यामुळे मेहंदी सुकल्यानंतर गळणार नाही आणि रंगही गडद होईल.

विक्स वापरा

सर्दी आणि खोकल्यासाठी वापरला जाणारा विक्स तुमच्या मेहंदीचा रंग देखील गडद करू शकतो. यासाठी मेहंदी काढल्यानंतर हातांवर विक्स लावा. रात्री झोपण्यापूर्वी हे लावा. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दिसेल की मेहंदीचा रंग गडद झाला आहे.

कॉफी पावडर

तुम्हाला जर मेहंदीचा रंग गडद करायचा असेल तर कॉफी पावडर देखील तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. कॉफी पावडरची थोडी पातळ पेस्ट बनवा आणि ते मेहंदी लावलेल्या हातांवर लावा आणि हलक्या हाताने चोळा. यामुळे मेहंदीचा रंगही गडद होतो.

मेहंदी जास्त काळ काळी ठेवण्यासाठी टिप्स

मेहंदीचा रंग गडद करण्यासाठी मेहंदी निघाल्यानंतर लगेच मोहरीचे तेल किंवा लवंगाचे तेल लावा. लक्षात ठेवा की मेहंदी काढल्यानंतर तुम्ही किमान 12 तास साबण आणि पाण्याला स्पर्श करू नये.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)