भारत म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी आहे. येथे प्रत्येक शहराला स्वत:चा इतिहास आहे. या शहरांना पाहण्यासाठी लांबून लांबून पर्यटक येत असतात. पर्यटकांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते. अलिकडे व्हीलेज टुरिझमला देखील लोकांना जवळून पाहायचे असते. यासाठी एकाहून एक अनोख्या गावांची सैर केली जात आहे.
आज आपण भारताच्या अशा गावाला भेट देणार आहोत. जेथे एकही कार किंवा वाहन चालत नाही. येथे येणाऱ्या लोकांना घोड्यांवरुनच प्रवास करावा लागतो. हा पर्यटकांसाठी स्वतंत्रपणे वेगळाच अनुभव आहे. यामुळे पर्यटकांचा प्रवास सुखद बनला आहे.
भारत एकमेव शहर
वास्तविक, महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान ( Matheran City ) देशातच नाही तर संपूर्ण आशियातील एकमेव शहर आहे. जेथे कोणत्याही प्रकारचे वाहन चालविण्यास मनाई आहे. या शहराला लोक ऑटोमोबाईल वाहन फ्री सिटी म्हणून ओळखले जाते. येथे फिरण्यासाठी अडीच किलोमीटरचे अंतर पायी पार करावे लागते. किंवा तुम्हाला घोड्यांवरुन सर्व पॉईंट पाहावे लागती. हे भारताचे सर्वात लहान हिल स्टेशन आहे. जे केवळ ७ किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.
घोडस्वारी आणि टॉय ट्रेनची मजा
माथेरान येथे गिरीस्थान नगर परिषदही देखील आहे. येथे सहा हजाराच्या आसपास लोक संख्या आहे. माथेरान डोंगरावर वसले आहे.मुंबईपासून सर्वात जवळ असूनही येथे थंडगार वातावरण असते. समुद्रसपाटीपासून २,६३५ फूट उंचीवर आहे. चार बाजूंनी घेरल्यामुळे पर्यटकांना येथे आनंद मिळतो. येथील पर्यावरणाचे नुकसान होऊ नये म्हणून येथे राज्य सरकारने माथेरान इको संवदेनशील म्हणून जाहीर केले आहे.येथे तुम्ही घोडेस्वारीसह मिनी ट्रेनचा आनंद देखील घेऊ शकतात. साल १९०७ मध्ये टॉय ट्रेनचा प्रवास सुरु केला. माथेरानचा जंगलातून २० किलोमीटर अंतरावर आहे.
आल्हादायक वातावरण
वर्षभर येथेआल्हादायक वातावरण असते.येथे थंडीत आणि पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेता येतो. आपला माथेरानला धरतीचा स्वर्ग देखील म्हटले तर वावगे नाही. हार्ट पॉईंट, ट्री हील पॉईंट येथे तुम्ही जाऊन निसर्गाचा आनंद घेऊ शकता. तसेच रामबाग,पॅनारोमा पॉईंट येथे सुर्योदय आणि सुर्यास्ताचे अनोखे दृश्य पाहू शकता.