Pahalgam Attack : रशियानंतर आता या ताकदवान इस्लामिक देशाने PM MODI यांच्याशी हस्तांदोलन, भारताला दिला संपूर्ण पाठींबा

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात प्रचंड तणाव पसरला आहे. त्यात आता रशियाने भारताला मोठा पाठिंबा दिल्याने दिलासा मिळत असतानाच आता एका मोठ्या मुस्लीम देशाने भारताला फोन करुन पाठिंबा दिला आहे.कतारचे पंतप्रधान अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी टेलिफोनवरुन चर्चा केली आहे.आणि पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारताच्या सर्व कारवाईला समर्थन दिले आहे.

काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा बहुतांशी देशांनी निषेध केला आहे. अमेरिका आणि रशियासारख्या महाशक्तींनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा करुन त्यांना पाठींबा दिला आहे. सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दरम्यान फोनवर मोठी बातचीत झाली आहे. भारताच्या कारवाईला आता रशियाने संपूर्ण पाठींबा दिलेला आहे. आता एका ताकदवान मुस्लीम देशाने भारतास पाठींबा आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने एका प्रसिद्धीस दिलेल्या वक्तव्यात म्हटलेय की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी टेलिफोनवर झालेल्या संभाषणात कतारचे अमीर शेख तमीम बिन अल-थानी यांनी भारतावर पहलगाममध्ये सीमेपलिकडून केलेल्या गोळीबारात ठार झालेल्या लोकांच्या प्रती सहवेदना व्यक्त केलीआहे. अतिरेक्यांविरोधात भारताची लढाई आणि गुन्हेगारांना न्यायालयाच्या कोठडीत आणण्यासाठी भारताच्या कारवाईसाठी पाठींबा दर्शविला आहे

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)