तुम्ही जर घरी हेअर स्पा करत असाल तर ‘या’ 5 महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात

उन्हाळा येताच आरोग्यासोबतच आपण केसांचीही विशेष काळजी घेत असतो. कारण कडक उन्हाळा आणि धुळीमुळे केस खूप कोरडे आणि निर्जीव होतात, जे फक्त शाम्पूने धुवून दुरुस्त करता येत नाहीत. अशावेळेस केसांनाही भरपूर पोषक तत्वांची आवश्यकता असते. यासाठी महिला अनेकदा हेअर स्पा ट्रीटमेंट घेतात जी पार्लरमध्ये खूप महाग असते आणि त्यासाठी वेळही लागतो.

हेच कारण आहे की अनेक महिला बजेट आणि वेळ वाचवण्यासाठी घरी हेअर स्पा करतात. जर तुम्ही घरी हेअर स्पा करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने हेअर स्पा केला तर ते तुमच्या केसांना फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतो. घरी पहिल्यांदा स्पा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते आपण आजच्या या लेखातून जाणून घेऊया?

1. योग्य उत्पादने निवडणे

काही महिला हेअर स्पासाठी बाजारातून कोणताही हेअर मास्क आणतात. तर असे करणे तुमच्या केसांसाठी चुकीचे ठरू शकते. कारण तुम्ही नेहमी तुमच्या केसांच्या प्रकारानुसार हेअर मास्क लावावा. जर तुम्ही चुकीचा मास्क किंवा क्रीम वापराल तर त्याचा तुमच्या केसांना काहीही उपयोग होणार नाही. तसेच फक्त नैसर्गिक घटकांपासून बनवलेले प्रॉडक्ट वापरण्याचा प्रयत्न करा.

2. तुमचे केस पूर्णपणे स्वच्छ करा

हेअर स्पा करताना काही लोकं थेट केसांवर हेअर मास्क किंवा क्रीम लावतात. पण असे करणे तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते. हेअर क्रीम किंवा मास्क लावण्यापूर्वी, केस सौम्य शाम्पूने धुवा आणि त्यानंतरच प्रॉडक्टचा वापर करा. असे केल्याने हेअर मास्कमध्ये असलेले पोषण चांगले शोषले जाईल.

3. वाफ द्या

हेअर स्पा करताना केसांना वाफ देणे खूप महत्वाचे आहे. यामुळे टाळूचे छिद्र उघडतात आणि क्रीम किंवा तेल आत खोलवर काम करते. जर स्टीमर नसेल तर गरम पाण्यात टॉवेल भिजवा आणि तो डोक्यावर 10-15 मिनिटे ठेवा. पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या डोक्याला 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाफ देऊ नये. तसेच टॉवेल जास्त गरम नसावा.

4. मसाज करणे

हेअर स्पा म्हणजे फक्त हेअर मास्क लावणे आणि केसांना वाफ देणे असे नाही. खरं तर, मास्क लावल्यानंतर केसांना मसाज करणे देखील खूप महत्वाचे आहे. म्हणून, हेअर स्पा करताना, टाळूचा हलका मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि केसांना चांगले पोषक तत्व मिळतात.

5. स्पा नंतर योग्य काळजी घ्या

हेअर स्पा नंतर केसांची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. अशावेळेस तूम्ही जेव्हा हेअर स्पा करता त्यानंतर लगेचच हेवी कॅमिकल प्रॉडक्ट वापरू नका. केस मोकळे ठेवा किंवा हलकी वेणी बांधा जेणेकरून ते श्वास घेऊ शकतील आणि तुटणार नाहीत.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)