भारत-पाक तणावात केंद्रीय गृहमंत्रालयाचा एक आदेश… मुंबईत नेमकं काय घडतंय? समुद्र किनारी…

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मॉक ड्रील होत आहे. मुंबईत हाय अलर्ट आहे. मुंबई हे संवेदनशील ठिकाण असल्याने येथे विशेष काळजी घेण्यात येत आहे. मुंबई पाकिस्तानच्या मिसाईलच्या टप्प्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संरक्षणासाठी मोठी कवायत सुरू आहे. त्याची तयारी आता सुरू झाली आहे. युद्ध सुरू असताना कुठे काय करायचं, कसं लपायचं, वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे.

मॉक ड्रीलची तयारी सुरू

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर राज्यात १० ठिकाणी सिव्हील नागरी सुरक्षा विभागाकडून मॉक ड्रीलच्या तयारीला सुरवात करण्यात आली आहे. समुद्र किनारी ४ तर शहरांत ६ पथकं मॉक ड्रील करणार आहेत. आज १२ वाजता मुंबई आणि मुंबई उपनगर, जिल्हाधिकारी, पोलीस महासंचालक यांच्यात महत्वाची बैठक होणार आहे.

बैठकीत तीन सत्रात ( सकाळ, दुपार , रात्री ) मॉक ड्रील घेतली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात सिविल डिफेंसचे १० हजार सैनिक या मॉक ड्रील मध्ये प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. यात युद्ध सुरू असताना कुठे काय करायचं, कसं लपायचं, वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे. आज दुपारनंतर याबाबत महत्वपूर्ण माहिती गृह विभागाकडून जाहीर होणार आहे.

मॉक ड्रीलमध्ये काय काय

संरक्षण तज्ज्ञ कॅप्टन योगेश भदाणे यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, 1971 साली पहिलं मॉक ड्रिल झाली होती. युद्धजन्य परिस्थिती सारखी परिस्थिती निर्माण करून दुसर्‍यांचा बचाव आणि स्वत:चा बचाव कसा करायचा याच प्रशिक्षण दिले जाईल. उद्याच मॉक ड्रिल सिलेक्टेड मोटरला आहे.

1. उद्या एक सायरन वाजवला जाईल. हा सायरन म्हणजे अलर्टनेस आहे.

2. दुष्मन आपल्या धरतीवर हल्ला करणार याचा हा सिग्नल आहे.

3. आपल्या घरातील लाईट, इंटरनेट बंद करायचे

4. टेबल किंवा पलंगाखाली संरक्षणासाठी पाहिजे

5. घरातील सुरक्षित ठिकाणी आपण वाचू शकतो अशा ठिकाणी लपायचे

6. हे सगळं प्रशिक्षण या निमित्ताने दिल जाईल

7. प्रत्येक भारतीय साठी हे मॉक ड्रिल आहे. युद्ध कोणत्या दिशेला जाईल हे सांगता येत नाही

8. इस्त्रायल सारख्या देशांमध्ये हे मॉक ड्रिल नागरिकांसाठी अनिवार्य आहे

9. राष्ट्रीय स्तरावर एनडीआरएफ मॉक ड्रिल घेणार

10. तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि आपत्कालीन व्यवस्थापन हे मॉक ड्रिल घेणार

ही दोन शहरे टार्गेटवर

संरक्षण तज्ज्ञ सतीश ढगे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. 7 तारखेपासून संपूर्ण देशातील संवेदनशील शहरात मोकद्रील घेण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे, यात आर्मी, राज्य सुरक्षा यंत्रणा, पोलीस, होमगार्ड, एनसीसी, एनएसएस, नेहरू युवा मंडळ यांना सोबत घेऊन मॉकड्रील होतात, यात सायरन यंत्रणा व्यवस्थित आहे का हे तपासले जाते, अचानक हल्ला झाला तर त्याला तोंड कसे द्यावं, जखमी लोकांना मदत फस्ट एड या बाबींची व्यवस्था केली जाते

1. रात्री लाईट बंद करणे ही एक महत्वाची बाब आहे ज्यात रात्री हल्ला होणार असेल आणि अचानक लाईट बंद केली तर शत्रूचे टार्गेट बदलू शकते.

2.महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे हे दोन शहरे पाकिस्तानच्या टार्गेट वर आहेत, मात्र या दोन्ही शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने चांगली तयारी केली आहे.

3.आयर्न डोम हे सुद्धा भारताने रशियाकडून घेतले आहेत, मात्र तरीही धोका होऊ नये यासाठी देशभरात तयारी महत्वाची असते त्यामुळे मॉकड्रील महत्वाचे आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)