तुमचे केस खूप गळतायत? तुमच्या ‘या’ रोजच्या चुकाही असू शकतात कारण!

केस गळणं ही आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अगदी सामान्य बाब झाली आहे. आपण नकळत काही गोष्टी करत असतो ज्या हळूहळू आपल्या केसांच्या मुळांवर परिणाम करत जातात. आणि मग जेव्हा केसांचे लोळे हातात यायला लागतात, तेव्हा उपाय शोधायला सुरुवात होते. त्यामुळे वेळेत सावध व्हा आणि ‘या’ सवयी थंबवा

१. ओल्या केसांवर कंगवा चालवणं

ही एक खूप सामान्य चूक आहे जी अनेक जण करतात. केस ओले असताना त्यांची मुळं खूप नाजूक आणि कमकुवत झालेली असतात. अशावेळी केसांमध्ये कंगवा फिरवल्यास ते सहजपणे तुटतात किंवा मुळांपासून निघून येतात.

काय कराल? केस थोडेसे वाळू द्या, मगच मोठ्या दातांचा कंगवा किंवा बोटांनी मोकळं करा.

२. रोज केमीकल्स युक्त शॅम्पू हेअर प्रोडक्ट्स वापरणे

रोज केस धुणं म्हणजे स्वच्छतेचं लक्षण वाटतं, पण हे केसांसाठी घातक ठरू शकतं. केसांना आवश्यक नैसर्गिक तेल काढून टाकल्याने ते अधिक कोरडे होतात आणि मुळं कमकुवत होतात.

काय कराल? आठवड्यातून २-३ वेळा केस धुणं योग्य. स्कॅल्पला स्वच्छता द्या, पण अति नको!

३. स्कॅल्प स्वच्छ न राहिल्यास केस गळणारच!

केस धुताना फक्त केसांनाच नाही, तर स्कॅल्पला ही नीट साफ करणं खूप महत्त्वाचं आहे. स्कॅल्पवर साचलेली धूळ, घाम आणि अतिरिक्त तेल यामुळे केसांची मुळं बंद होऊ शकतात, ज्यामुळे केस गळतात.

काय कराल? शॅम्पू करताना स्कॅल्पवर सौम्य मसाज करा आणि नंतर भरपूर पाण्याने स्वच्छ धुवा.

४. केस घट्ट बांधणं म्हणजे हळूहळू मुळं खेचणं!

सतत पोनीटेल, अंबाडा किंवा वेणी घट्ट बांधल्याने केसांच्या मुळांवर सतत ताण येतो. याचा परिणाम विशेषतः कपाळाजवळच्या केसांवर दिसतो.

काय कराल? केस सैलसर बांधा. रोज वेगवेगळ्या हेअरस्टाईल ट्राय करा. केसांनाही आराम हवा असतो!

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)