उन्हाळ्याच्या हंगामात, कलिंगड तसेच खरबूज यांसारखी गोड आणि रसाळ फळे बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आणि लोकांना ती खूप खायला आवडतात. कारण या हंगामी फळांमध्ये पोटॅशियम, लायकोपीन, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि ए सारखे अनेक पोषक घटक असतात. तसेच उन्हाळ्यात तापमान वाढत असल्याने अनेकांना डिहायड्रेशनची समस्या उद्भवते ज्यामुळे अनेक आजार होतात आणि त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. टरबूजमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी असते ज्यामुळे उन्हाळ्यात शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. आरोग्यासोबतच या फळांचे सेवन केल्याने तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या जसे की मुरुमे, सुरकुत्या, डाग इत्यादींपासूनही आराम मिळतो. पण तुम्हाला माहिती आहे का की कलिंगडाचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकदार होते.
चमकदार त्वचेसाठी आपण चेहऱ्यावर मुलतानी माती, बटाट्याचा रस, कोरफड, गुलाबपाणी असे अनेक नैसर्गिक उपाय करत असतो. परंतु तुम्ही चेहऱ्यावर कलिंगडाचा रस लावल्याचे ऐकले आहे का? हो, हे जरा ऐकायला वेगळे वाटतंय पण तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कलिंगडाचा रस लावू शकता आणि त्याचे अनेक फायदे तुम्हच्या त्वचेला होत असतात. चला तर मग आजच्या लेखात कलिंगडाच्या रस लावल्याने कोणते आश्चर्यकारक फायदे होतात त्याबद्दल जाणून घेऊयात…
चेहऱ्यावर कलिंगडाचा रस लावण्याचे फायदे
त्वचा हायड्रेट ठेवते
कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते ज्यामुळे ते त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि त्वचेची नैसर्गिक चमक टिकवून ठेवते. त्यात हायड्रेटिंग गुणधर्म आहेत जे चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात.
मुरुम कमी करते
कलिंगडामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, त्यामुळे त्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने मुरुमांची समस्या दूर होते आणि त्यामुळे चेहरा थंड होतो आणि मुरुमे कमी होतात.
डाग कमी करते
कलिंगडा खाण्यासोबतच तुम्ही त्याचा रस चेहऱ्यावर देखील लावू शकता कारण त्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते, त्यामुळे ते चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास मदत करते आणि त्वचा चमकदार बनवते.
चमकणारी त्वचा
चमकदार त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही कलिंगडाच्या रसात थोडे दूध मिसळून चेहऱ्यावर लावू शकता आणि ते सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते.
चमकदार त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही कलिंगडाच्या रसापासून बनवलेले हे घरगुती उपाय अवलंबू शकता, यामुळे तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक कायम राहील.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)