घरी पिकलेल्या आंब्यापासून जॅम बनवणं खूप सोपं आहे. फक्त 3 स्टेप्समध्ये स्वादिष्ट आंब्याचा जॅम तयार करा. तर आज आम्ही तुम्हाला आंब्याचा जॅम बनवण्याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत.
आंब्याचा जॅम बनवण्यासाठी तुम्हाला 4 -5 पिकलेले आंबे, 1 कप साखर आणि 1 चमचा लिंबाचा रस लागेल. आता आंब्याचा जॅम बनवण्यासाठी, प्रथम आंबे पाण्याने चांगले धुवा.
नंतर आंबा सोलून त्याचे लहान तुकडे करून पेस्ट बनवा. आता एका पॅनमध्ये थोडं तूप गरम करा, नंतर त्यात आंब्याची पेस्ट घाला आणि गरम होऊ द्या.
यावेळी, आंब्याची पेस्ट भांड्याच्या तळाशी जळू नये याची काळजी घ्या. आंब्याच्या पेस्टमधील पाणी कमी झालं की त्यात साखर घाला आणि सतत ढवळत राहा. आंब्याच्या गोडव्यानुसार साखर घाला म्हणजे जॅम जास्त गोड होणार नाही.
जॅम मिश्रणातील साखरेचं पाणी आटल्यानंतर त्यात लिंबाचा रस घाला आणि चांगलं मिसळून घ्या. आंब्याचा जॅम थोडा थंड झाल्यावर तुम्ही तो काचेच्या भांड्यात ठेवू शकता.