महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथील दरे गावात गेले असता तेथे अभिनेते नाना पाटेकर यांनी शिंदे यांच्या शेताला भेट देत अननसाचे झाड देखील लावले. यावेळी नाना पाटेकर यांनी एकनाथ शिंदे यांची तोंडभरुन कौतूक केले. ते म्हणाले की एकनाथ शिंदे यांना आपण ते बाळासाहेबचे शिवसैनिक असल्यापासून ओळखत आहे.आमची मैत्री जुनी आहे मी त्यांच्याकडे काही मागत नाही..अशी पुस्ती त्यांनी यावेळी जोडली.
नाना पाटेकर पुढे म्हणाले की काही राजकीय मंडळी आहेत. त्यांच्यावर काही ठपका नाही.. त्यांच्या पैकी एक म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. यांच्यावर एक ही डाग पाहायला मिळाला नाही. देवेंद्र आणि अजित या दोघांना सुद्धा मी जवळून ओळखतो. त्यांचे सुद्धा काम चांगले आहे. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्याकडे कोणी बोट दाखवू शकले नाही अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी शिंदे यांचे कौतूक केले आहे.
एकनाथ शिंदे आणि नाना पाटेकर दरे गावी भेट
गाळ मुक्तधरण, गाळयुक्त शिवार, या योजनेच्या शुभारंभ अभिनेते नाना पाटेकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला.यावेळी नाना पाटेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंड भरून कौतुक केले. एकनाथ शिंदे यांना आपण ते बाळासाहेबचे शिवसैनिक असल्यापासून ओळखत आहे. आमची मैत्री जुनी आहे मी त्याच्याकडे काही मागत नाही. काही राजकीय मंडळी आहेत त्यांच्यावर काही ठपका नाही त्यांच्या पैकी एक म्हणजे एकनाथ शिंदे आहेत..यांच्यावर एक ही डाग पाहायला मिळाला नाही. देवेंद्र आणि अजित या दोघांना सुद्धा मी जवळून ओळखतो त्यांचे सुद्धा काम चांगले आहे. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्याकडे कोणी बोट दाखवू शकले नाही असे अभिनेते नाना पाटेकर यावेळी म्हणाले.
शेतात अननसाची लागवड…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे या गावी नाना पाटेकर आले असता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शेतामध्ये अननसाच्या झाडाची लागवड केली. यावेळी त्यांच्या शेतातील फळांचाही आस्वाद नानांनी घेतला. चिकू, स्ट्रॉबेरी, मालबेरी, फणस यां सारखी अनेक प्रकारची फळे त्यांनी खाल्ली आणि त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे फणसाची मागणी केली.