अजितदादांचा मोठा धक्का, आणखी एक नेता शरद पवारांची साथ सोडणार

मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला पुन्हा एक धक्का बसला आहे.  राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. ते उद्या आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडे दिला आहे.

हा जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडे दिला आहे. आता उद्या ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत, या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

     उद्धव ठाकरेंनाही धक्का  

दरम्यान दुसरीकडे अजित पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार शरद पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली असून, ते उद्या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. उद्या दुपारी दोन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. शरद पाटील हे आधी शिवसेनेमध्ये होते, त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर ते पुन्हा शिवसेना ठाकरे गटात आले. विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं नाही म्हणून ते पक्षावर नाराज होते, अखेर ते उद्या आता अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश कणार आहेत. हा शिवसेना ठाकरे गटासाठी धुळ्यात मोठा धक्का मानला जात आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)