स्वयंपाक घरातील ‘या’ गोष्टी त्वचेला खोलवर करतील स्वच्छ, मेकअप रिमूव्हरची भासणार नाही गरज

सध्या लग्नसराईला सुरूवात झाली आहे. अशा वेळेस आपण दिवसभर मेकअप मध्ये असतो. त्यात जर मेकअप दिवसभर चेहऱ्यावर राहिला आणि रात्री काढला नाही तर त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. तर मेकअप काढण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण बाजारात मेकअप रिमूव्हर्स आणि मेकअप रिमूव्हिंग वाइप्स उपलब्ध असतात यांचा वापर करतात. दरम्यान प्रत्येक ब्युटी प्रॉडक्टमध्ये कॅमिकल असल्यामुळे त्वचेवर यांचा परिणाम तर होतोच शिवाय चेहरा वयापेक्षा जुना दिसू शकतो. अशातच तुमच्या स्वयंपाक घरात अशा अनेक गोष्टी आहेत जे त्वचा खोलवर स्वच्छ करण्यास मदत करतात. म्हणून तुम्ही मेकअप काढल्यानंतरच झोपावे जेणेकरून घाण किंवा मेकअपचे बारीक कण छिद्रांमध्ये जमा होणार नाहीत. तर तुम्ही सुद्धा या नैसर्गिक गोष्टींनी मेकअप काढू शकता आणि त्यामुळे त्वचेचे पोषण करण्यासोबतच त्वचेच्या समस्या कमी होतील.

मेकअप काढण्यासाठी त्वचेची खोलवर स्वच्छता करणे आवश्यक असतेच, पण त्यामुळे छिद्रांमध्ये साचलेली घाण देखील साफ होते, ज्यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सची शक्यता कमी होते. अशातच त्वचा फ्रेश दिसते आणि मुरुमे येत नाहीत. नैसर्गिक गोष्टींनी खोल साफसफाई करताना, हलका मसाज देखील केला जातो, ज्यामुळे त्वचेतील रक्तप्रवाह सुधारतो आणि त्वचेवर नैसर्गिक चमक टिकून राहते. त्वचेच्या खोल साफसफाईसाठी तुम्ही कोणत्या गोष्टी वापरू शकता ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात…

कच्च्या दूधाचा वापर

मेकअप काढण्यासाठी तुम्ही कच्चे दूध वापरू शकता. यासाठी, दुधात कापसाचा गोळा बुडवा आणि त्याद्वारे तुमचा चेहरा स्वच्छ करा. दूध त्वचेला स्वच्छ करण्यासोबतच तिला हायड्रेट करते आणि उन्हाळ्यात होणाऱ्या त्वचेच्या जळजळीपासून संरक्षण करून त्वचेला मऊ बनवते. हे एक क्लिंझर आहे जे प्रत्येक स्किनटोनसाठी योग्य आहे.

काकडीचा रस

उन्हाळ्यात त्वचेला ताजेतवाने ठेवण्यासाठी आणि तेलकटपणा रोखण्यासाठी काकडी हा एक उत्कृष्ट नैसर्गिक घटक आहे. फेस पॅकमध्ये काकडी मिसळणे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे आणि तुम्ही काकडीचा रस मेकअप रिमूव्हर म्हणून देखील वापरू शकता. यामुळे त्वचेवरील सूज कमी होते आणि त्वचा फ्रेश आणि चमकदार होते.

नारळ तेल

नारळ तेल हे त्वचेसाठी देखील एक चांगले नैसर्गिक घटक आहे. याच्या मदतीने तुमच्या चेहऱ्याला मसाज करता येते आणि ते डीप क्लींजर म्हणून देखील वापरले जाऊ शकते. जर तुम्ही वॉटरप्रूफ मेकअप वापरला असेल तर नारळाच्या तेलाने मेकअप रिमुव्ह करणे सर्वात चांगले ठरेल. यामुळे त्वचेचा कोरडेपणा देखील कमी होतो आणि नारळ तेल संवेदनशील त्वचेसाठी देखील चांगले आहे.

दही एक उत्कृष्ट क्लिंजर आहे

जर तुम्हाला तुमची त्वचा खोलवर स्वच्छ करायची असेल तर दही हा एक उत्कृष्ट नैसर्गिक घटक आहे. तुम्ही मेकअप साफ करण्यासाठी याचा वापर करू शकता. हातात थोडे दही घ्या आणि चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते आणि त्वचा उजळते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)