४५० झाडांवर कुऱ्हाड? मुंबईत रस्ते, रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी छाटणी प्रस्तावित

प्रतिनिधी, मुंबई : मुंबईमध्ये महापालिका आणि रेल्वेच्या प्रकल्पांसाठी तब्बल ४५० झाडांची कत्तल प्रस्तावित आहे. पूर्व मुक्त मार्गाचा सध्याचा सर्व्हिस रोड वाढवण्यासाठी ३८२ झाडे हटवावी लागणार आहेत. ३१६ झाडे कापली जाणार असून ६६ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. तर गोरेगाव-बोरिवली सहाव्या मार्गिकेसाठी १३० झाडे, कांदिवली येथील लालजीपाडा प्रस्तावित पुलासाठी ४ झाडे तोडणे प्रस्तावित आहे.मुंबईतील वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी पालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांमुळे २०२३ मध्ये सलग तिसऱ्या वर्षी ‘जागतिक वृक्ष नगरी’चा पुरस्कार पटकावून पालिका आपलीच पाठ थोपटून घेत असताना दुसरीकडे राष्ट्रीय हरित लवादाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह पालिकेला शहरात कमी होत चाललेल्या हिरवळीसाठी नोटिसा बजावल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुंबईच्या विविध भागात सरकारी प्रकल्पांसाठी शेकडो झाडांच्या कत्तलीची माहिती समोर आली आहे.
काँक्रिटीकरण रात्रीच! आयआयटीच्या तज्ज्ञांची महापालिकेला सूचना
पूर्व मुक्त मार्गावरील भक्ती पार्क ते जिजामाता चौकापर्यंतचा सर्विस रोड ४ किमीचा प्रस्तावित करण्यात आला आहे. दया शंकर मार्ग आणि मुंबई पोर्ट ट्रस्टदरम्यान हे विस्तारीकरण प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी पालिका ६२ कोटी रुपये खर्च करणार आहे. यापूर्वी या रस्त्याची देखभाल एमएमआरडीए करत होती. २०१५मध्ये पूर्व मुक्त मार्ग एमएमआरडीएकडून पालिकेकडे सोपविण्यात आल्याने आता या मार्गाची जबाबदारी पालिकेवर आली आहे.
मुंबईकरांच्या आरोग्यासाठी २२७ प्रभागांमध्ये निरंतर स्वच्छता मोहीम,‘रिसायकल वॉटर’चा वापर
नवीन सर्व्हिस रोड या मार्गावरील पुलाखालून पूर्व मुक्त मार्गाला समांतर जोडला जाणार आहे. सध्याच्या रस्त्याची रुंदी ४० मीटर असून ती ६० मीटर प्रस्तावित आहे. त्यासाठी ३८२ झाडे काढावी लागणार आहेत. यापैकी ३१६ झाडे कापली जाणार असून ६६ झाडांचे पुनर्रोपण प्रस्तावित आहे. तर कांदिवली पश्चिम, लिंक रोड येथील लालजीपाडा पुलासाठी चार झाडांचा बळी जाणार असल्याची माहिती या संबंधित प्रस्तावात देण्यात आली आहे. याबाबत पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्याकडे विचारणा केली असता या प्रकरणी माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

शक्यतो झाडं लावा, नाहीतर तोडा; ही कायद्यातील भंगार ओळ : सयाजी शिंदे

रेल्वेसाठी ३५७ झाडांचा बळी?

हार्बर मार्गावरील गोरेगाव ते बोरिवली सहाव्या मार्गिकेचे काम वेगाने सुरू आहे. या कामाआड मालाड पूर्व आणि पश्चिम बाजूने झाडे कापण्याचे दोन प्रस्ताव पश्चिम रेल्वेच्या मुख्य अभियंत्यांनी (बांधकाम) तयार केले आहेत. त्यात पूर्वेकडे १३० तर पश्चिमेला २२७ झाडे काढावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ही प्रस्ताव छपाईतील चूक आहे की, झाडे कापणे प्रस्तावित आहे, हे समजू शकलेले नाही. पर्यावरण अभ्यासक झोरू बथेना यांनी याबाबत ‘एक्स’वर पोस्ट करून मालाड पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूने इतक्या मोठ्या प्रमाणात झाडे काढणे कसे शक्य आहे, असा प्रश्न विचारला आहे.