लिपस्टिक हा आपल्या प्रत्येक महिलांच्या मेकअपचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यातच लिपस्टिक ही अशी गोष्ट आहे जी आजकाल बहुतेक स्त्रियांच्या रोजच्या मेकअप रूटीनमध्ये वापरली जाते. लिपस्टिकशिवाय मेकअप अपूर्ण मानला जातो. तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या शेड्सच्या लिपस्टिक सहज मिळतात. कारण तुमच्या त्वचेच्या रंगानुसार तुमच्या ओठांचे आणि चेहऱ्याचे सौंदर्य वाढवणाऱ्या लिपस्टिकचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. आता लिपस्टिकमध्ये इतके प्रकार आहेत की मॅट, शिमरपासून ते लिक्विड लिपस्टिकपर्यंत बाजारात सहज उपलब्ध आहे जी तुमच्या स्किनटोनसाठी परिपूर्ण असेल.
महिलांच्या मेकअप बॉक्समधील लिपस्टिक हा एक महत्त्वाचा भाग आहे जो प्रत्येक महिलेचा लूक आणि ओठांचे सौंदर्य देखील वाढवतो. तर अशा या लिपस्टिकचा इतिहास नेमका काय आहे. तसेच मेकअपचा भाग कशी बनली? आज या लेखात आपण महिलांच्या आवडत्या लिपस्टिकचा इतिहास काय आहे हे जाणून घेणार आहोत.
5000 वर्ष जुना लिपस्टिकचा इतिहास
तसं पाहिला गेलं तर लिपस्टिकचा इतिहास हा शतकानुशतके जुना आहे, फक्त त्याची रचना नवीन झाली आहे. लिपस्टिकचा इतिहास 5000 वर्ष जुना आहे. पूर्वीच्या काळात महिला या विशिष्ट फुले आणि मौल्यवान दगड बारीक करून ओठांवर लावत असत. विशेष म्हणजे ही प्रथा आजची नाही तर 5000 वर्षे जुनी आहे. त्यातच पूर्वीच्या काळात लिपस्टिक नैसर्गिक पद्धतींनी बनवली जात असे आणि ती औषध म्हणूनही काम करत असे. परंतू काही काळानंतर आपल्याला आज बाजारात हव्या त्या रंगात आणि शेड्समध्ये लिपस्टिक मिळते. एवढंच नाही तर वेगवेगळ्या ब्रँडच्या लिपस्टिक देखील उपलब्ध आहेत.
लिपस्टिकचा मनोरंजक इतिहास
इंग्लंडच्या राणी एलिझाबेथच्या काळातही लिपस्टिक प्रचलित होती. एलिझाबेथ यांनी लाल लिपस्टिक लावण्याचा ट्रेंड लोकप्रिय केला.
त्या काळात, लिपस्टिक फक्त अभिनेत्रींपुरती मर्यादित होती आणि तीन शतके ती त्यांच्यापुरती मर्यादित राहिली.
1880 मध्ये, गेरलेन नावाच्या फ्रेंच कंपनीने पहिल्यांदाच लिपस्टिक बाजारात आणली. ही लिपस्टिक हरणाच्या शरीरातून काढलेल्या चरबी, बीवॅक्स आणि एरंडेल तेलापासून बनवली जात होती आणि नंतर ती रेशीममध्ये मिसळून वापरली जात होती.
1915 मध्ये, मॉरिस लेव्ही यांनी दंडगोलाकार पॅकिंगमध्ये लिपस्टिकचे प्रॉडक्ट सुरू केले जे आजही ट्रेंडमध्ये आहे.
1920 मध्ये, लाल, जांभळा, चेरी आणि तपकिरी अशा लिपस्टिकच्या वेगवेगळ्या शेड्स ट्रेंडमध्ये आल्या. याच काळात फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ पॉल बौड्रॉक्स यांनी किस-प्रूफ लिपस्टिक तयार केली. तथापि, ते बाजारात आपले स्थान निर्माण करू शकले नाही कारण महिलांना ही लिपस्टिक पुसून काढणे खूप कठीण होत होते. त्यानंतर लिपस्टिकचा ट्रेंड बाजारांमध्ये वाढू लागला आणि शनेल, एस्टी लॉडर, ग्वेरलेन सारख्या कंपन्यांनी लिपस्टिक विकायला सुरुवात केली.
जर आपण 1980 आणि 1990 या काळातील लिपस्टिकच्या ट्रेंड बद्दन बोलायचो झालो तर लाल लिपस्टिकने पुन्हा एकदा बाजारात ट्रेंड सेट केला आणि महिलांमध्ये ती आवडती बनली. शिमर आणि ग्लॉस लिपस्टिकचा ट्रेंडही याच काळात आला.
यावेळी हॉट पिंक लिपस्टिक खूप लोकप्रिय झाली.
2000नंतर, लिपस्टिक मेकअपचा एक महत्त्वाचा भाग बनली. महिला लिपस्टिकशिवाय मेकअप करण्याची कल्पनाही करू शकत नव्हत्या. लिपस्टिकचा इतिहास मनोरंजक आणि कठीण दोन्ही होता. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही तयारी करताना लिपस्टिक लावाल तेव्हा तुम्हाला हा लेख वाचल्यानंतर लिपस्टिकचा इतिहास लक्षात येत राहिल.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)