मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते, शहाजी बापू पाटील यांनी काय केला दावा ?

गंगेचा उगम पवित्र आहे कारण तिचा उगम शंकराच्या जटेतून झाला आहे. त्यामुळे शिवसेना देखील पवित्र आहे कारण बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून तिचा उगम झाला आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या काळात शिवसेना मागे पडली. सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात पक्षाची सूत्रं दुसऱ्याकडे गेली त्यामुळे पक्षाची पीछेहाट झाली असा आरोप सोलापूरचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. शहाजी बापू पाटील पुढे म्हणाले की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वासाठी आपली लढाई आहे. तुम्ही आम्ही जसे मावळे आहोत तसेच मावळे त्यावेळी पानिपतला जाणारे होते. राज्याच्या कानकोपऱ्यात लोक म्हणतात, एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही असेही ते यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय राजकारण होऊ शकत नाही. मी निवडून यायला पाहिजे होते. मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते.कारण मी 1995 ला निवडून आलो तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. मी 2019 ला निवडून आलो तेव्हा उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. माझी रास शिवसेनेची आहे पण मी पूर्वी कसा काय काँग्रेसमध्ये गेलो होतो मला माहिती नाही असेही शहाजी बापू पाटील यांनी यावेळी जोर देत म्हणाले. सोलापूर जिल्ह्यात मागील दोन वर्षात पक्षाची सूत्रं दुसऱ्याकडे गेली त्यामुळे पक्षाची पीछेहाट झाली असेही ते यावेळी म्हणाले.

राज्याच्या कानकोपऱ्यात लोक म्हणतात, एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही. मागील दोन वर्षात एकनाथ शिंदे यांनी खूप कष्ट घेतले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात न भूतो न भविष्यती असा महाराष्ट्राचा ऐतिहासिक निकाल लागला. पवार साहेबांसारख्या माणसाचे केवळ 10 लोक निवडून आले. उद्धव ठाकरेंच्या हाताला तर आयोडेक्स लावायची वेळ आली होती. – मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.

बापू पण तुम्ही काळजी करू

माझ्याकडे पालघर, धाराशिव आणि सोलापूर ची जबाबदारी दिलीय. एकनाथ शिंदे साहेब देतात ते भरभरून देतात. येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यामुळे आपल्याला पक्ष संघटना आणखी मजबूत करायची आहे. शहाजी बापू यांच्या भाषणामुळे ते घराघरात पोहोचले. त्यांच्या काय डोंगार,काय झाडी यामुळे त्यांना लोकांचे प्रेम मिळाले. काम करणारी लोकं ही माजी आमदार म्हणून बसलेत, पण अशी माणसं मंत्री पदावर पाहिजेत. बापू पण तुम्ही काळजी करू नका तुम्ही अजून मजबूत आहात. पुढील पंचवार्षिकला तुम्ही पुन्हा याल असे यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक शहाजी बापूंचे कौतूक करताना म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)