मर्सिडीज महाराष्ट्रात ३ हजार कोटींची गुंतवणूक करणार; रोजगारात मोठी वाढ होईल, उद्योगमंत्र्यांना आशा
मुंबई : वाहननिर्मिती क्षेत्रातील नावाजलेली कंपनी मर्सिडीज-बेंझने महाराष्ट्रात यावर्षी ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जर्मनीमधील स्टुटगार्ट येथील बेंझच्या प्रकल्पाला भेट दिली. त्यावेळी ही घोषणा कंपनीकडून करण्यात आली.

उद्योगमंत्री सामंत यांचे शिष्टमंडळ सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर असून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा यांच्यासोबत गुरुवारी त्यांनी मर्सिडीज प्रकल्पाला भेट दिली. त्यावेळी उदय सामंत आणि मर्सिडीज बेंझचे कार्यकारिणी सदस्य डॉ. जॉर्ग बर्झर, संचालिका मॅरीना क्रेट्स, संचालक मार्टिन स्कल्झ, भारतातील कार्यकारी संचालक व्यंकटेश कुलकर्णी यांच्यामध्ये महाराष्ट्रातील गुंतवणुकीसंदर्भात चर्चा झाली. चर्चेदरम्यान, मर्सिडीज बेंझ यावर्षी महाराष्ट्रामध्ये ३ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे मर्सिडीज बेंझकडून जाहीर करण्यात आले.
Kuwait Fire: कुवेतमधील इमारतीला आग, मृतांमधील ४५ भारतीयांची ओळख पटली; सर्वाधिक मृत केरळचे
कंपनीची घोषणा ही राज्यात अधिकाधिक थेट परदेशी गुंतवणूक आणण्याच्या प्रयत्नांतील महत्त्वाचा टप्पा असून महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसह रोजगारातही मोठी वाढ होईल, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री सामंत यांनी दिली.