Prithviraj Chavan News : “जगभरात व्यापारी युद्ध सुरू झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडून आले. त्यांनी जो निर्णय घेतला त्याला तोंड द्यावे लागणार आहे. अमेरिकेने एकतर्फी निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रचंड मोठी महागाई निर्माण होईल. जगभरात मंदीचे वातावरण निर्माण होईल”, असं मोठं भाकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवलं आहे.
“भारत सरकारने आपल्या शेतकऱ्याच्या हिताचे संरक्षण केले नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. राज्य खंडखोरीचे बनले आहे. निवडणुकीत मोठी आश्वासन दिली. पण ते पूर्ण करू शकले नाहीत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असं सांगितलं. पण कर्जमाफी झाली नाही”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
‘लोकशाही जिवंत आहे का?’
“राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तीन पक्षातील नेत्यांचा तणाव हे भारतासाठी उपयोगी नाही. आदर्श राज्य म्हणून भारत होता. पण आता राहिला नाही. याचे परिणाम बेरोजगार शेतकरी यांच्यावर होणार आहेत. देश श्रीमंत होत आहे. पण राज्यातील लोक गरीब होत चालले आहेत. लोकशाही जिवंत आहे का? असा प्रश्न पडला आहे. हे सर्व भाजपने केले आहे. लोकशाहीचा बाजार झाला आहे”, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
“पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावरही प्रतिक्रिया दिली. “लवकरात लवकर जातनिहाय जनगणना करावी. विकासकामांची दिशा ठरविण्यास मदत होईल. केंद्र सरकारने निर्णय घेतला त्याचे स्वागत आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
“काँग्रेसचे विचार संपत नसतील तर माणसं संपवा, असे धोरण भाजपचे आहे. देशात हुकूमशाही सुरू आहे. दोन राष्ट्रीय पक्ष राहिले पाहिजेत. प्रादेशिक पक्ष संपत चालले आहेत. काही विलीन होत आहेत. पण देशाची लोकशाही भक्कम करण्यासाठी दोन राष्ट्रीय पक्ष हवेत”, अशी भूमिका पृथ्वाराज चव्हाण यांनी मांडली.