शरद पवार यांचे मोठे आवाहनImage Credit source: गुगल
पहलगाम दहशतवादी हल्ल्याने देशात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट आहे. 22 एप्रिल रोजी हा हल्ला करण्यात आला. त्यात 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला. दहशतवादी हे पाकिस्तानातून आले होते याचे पुरावे हाती आले आहेत. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची मागणी होत आहे. पाकिस्तानातील मंत्री, भारत येत्या 24 ते 36 तासांत केव्हा पण हल्ला करण्याची शक्यता असल्याचे सांगत आहेत. त्यातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
मंदिरात अनेकदा पूजा केली
ठाणे येथे एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार आले असताना त्यांनी अनेक विषयांवर मत व्यक्त केले. मी मंदिरात जात नाही, असं सांगितलं जातं. पण मला त्याचं प्रदर्शन करायला आवडत नाही, असे पवार म्हणाले. मी राज्याचा प्रमुख असताना चार ते पाच वेळा पंढरपूरला पांडुरंगाची पूजा केली होती. श्रीरामपूरच्या मंदिरात अनेकदा पूजा केली, अस ते म्हणाले. महाराष्ट्राच्या भल्यासाठी पूजेचं प्रदर्शन करू नये. आज मी माझी पत्नी आणि आमचे सहकारी आलो आहोत, असे ते म्हणाले.
कुटुंब एकत्र येत असेल तर आनंद
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि सेनेचे उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची राज्यात चर्चा सुरू आहे. त्यावर शरद पवार यांना माध्यमांनी विचारले असता, त्यांनी मोठे भाष्य केले. आता आपण पवित्र प्रांगणात आहोत. यात राजकारण आणू नका. राजकीय प्रश्न आणू नका. कोण कुटुंब एकत्र येत असेल तर आनंद आहे. पण त्यावर भाष्य करण्याचा आजचा प्रसंग नाही, असे पवार म्हणाले.
हा देशावरचा हल्ला
पहलगामवरील हल्ला हा या देशावरचा हल्ला आहे. ज्या व्यक्तींचे कुटुंब यात शहीद झाले. त्यांनी देशासाठी किंमत दिली आहे. त्यामुळे त्यांचा धर्म, जातपात भाषा या गोष्टी आणायच्या नाही, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रीयनांवर हल्ला होत असेल तर देशवासीय म्हणून एकत्र यावे लागेल. मी जाहीरपणे सांगितलं की पंतप्रधान जो काही निर्णय घेतली, उपाययोजना करतील त्याला आमचं समर्थन आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी आमच्या सहकाऱ्यांनी केली. या प्रश्नावर देश आणि सर्व पक्ष एक आहे. हा संदेश देण्यासाठी स्पेशल अधिवेशन उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
उभ्या महाराष्ट्रासाठी हे मंदीर खुलं
ठाण्यातील तुळजाभवानी मंदिराची प्राणप्रतिष्ठापना शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या हस्ते पार पडली. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, मिलिंद नार्वेकर हेदेखील यावेळी उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून प्रति तुळजापूर मंदिर साकारण्यात आलं आहे.
या मंदिराविषयी जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली. हे मंदिर 1500 हजार टनाचे आहे, एका दगडाचा एक खांब आहे. असे 26 खांब आहेत, दोन खाणीतून आपण दगड आणले असे ते म्हणाले. 4 वर्ष 50 मंजूर इथेच होते, मंदिरात कुठेच स्टील वापरण्यात आले नाही. मंदिराचे पूर्ण काम हेमाडपंथी आहे, कर्नाटकातून मजूर आणले होते
मूर्ती 2004 साली आंध्रप्रदेशातून आणली होती. उभ्या महाराष्ट्रासाठी हे मंदिर खुलं आहे कुठल्याही प्रकारचा जातीभेद इथे बाळगला जाणार नाही महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे, ज्याला ओसी आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांची सही आहे, त्यांनी मंदिर मंजूर केलं आहे, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.