तुम्ही जर मे महिन्यात ऊटीला भेट देण्याचा विचार करत असाल, तर तेथील ‘या’ प्रसिद्ध महोत्सवाला द्या भेट

Ooty trip in May then definitely visit flower show 2025Image Credit source: tv9 marathi

ऊटी हे तामिळनाडूच्या नीलगिरी पर्वतरांगांमध्ये वसलेले एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. येथे भेट देण्याचा योग्य काळ म्हणजे एप्रिल ते जून आहे. या दिवसांमध्ये येथील तापमान 15 ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान राहते. या काळात येथील हवामान आल्हाददायक राहते. आजूबाजूला हिरवळ आणि पर्वत या ठिकाणाच्या सौंदर्यात भर घालतात. येथे भेट देण्यासाठी तुम्हाला अनेक सुंदर ठिकाणं आहेत. त्यामुळे यादिवसांकरिता अनेक लोकं या ठिकाणी फुलांचा हा महोत्सव साजरा करण्यासाठी तेथे जात असतात.

जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परिपूर्ण असेल. येथे तुम्हाला हिरवळ, पर्वत आणि धबधब्यांच्या सौंदर्यात वेळ घालवण्याची संधी मिळेल. याशिवाय, या काळात येथे समय उत्सव देखील साजरा केला जातो. त्याबद्दल आपण या लेखात जाणून घेऊयात.

फुलांचा महोत्सव

जर तुम्ही मे महिन्यात ऊटीला भेट देण्याचा विचार करत असाल, तर या महिन्यात येथे ऊटी फ्लॉवर फेस्टिव्हल साजरा केला जातो, जो सहा दिवस चालतो. या वर्षी ते 16 ते 21 मे दरम्यान सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ऊटी येथील प्रसिद्ध बोटॅनिकल गार्डनमध्ये हा फेस्टिव्हल आयोजित केले जाणार आहे. अशावेळेस तुम्ही याचा आनंद घेऊ शकता.

ऊटी फ्लॉवर शोमध्ये अनेक प्रकारची फुले पाहता येतात. तसेच ते सजावटीसाठी अतिशय आकर्षक पद्धतीने वापरले जातात. दरवर्षी येथे मोठ्या संख्येने लोकं ऊटी फ्लॉवर फेस्टिव्हलसाठी येतात. या दिवसांमध्ये फुलांसोबतच फळे आणि भाज्यांचे अनेक प्रकारही तुम्हाला येथे दिसतील. फळांपासून बनवलेल्या रांगोळी आणि अनेक शिल्पे देखील येथे पाहायला मिळतील.

हा महोत्सव 1896 मध्ये सुरू झाला. या महोत्सवात 150 हून अधिक वेगवेगळ्या प्रकारची फुले आणि 15,000 कुंड्यांमध्ये लावलेली रोपं प्रदर्शित केली जातात, ज्यांचे सौंदर्य आणि सुगंध खूप आकर्षक असतात. तसेच या दिवसांमध्ये या महोत्सवात तुम्हाला संगीत आणि नृत्य असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येतो. त्या सोबत तुम्हाला येथे स्थानिक बागकाम पद्धती आणि संस्कृतीबद्दल देखील माहिती सांगितली जाते, म्हणून जर तुम्ही 16 ते 21 मे दरम्यान उटीला जाणार असाल तर तुम्ही या समर फ्लॉवर फेस्टिव्हलला नक्कीच भेट द्यावी.

या फ्लॉवर फेस्टिव्हलच्या तिकिटांबद्दल सांगायचे झाले तर प्रौढांसाठी 100 रुपये आणि मुलांसाठी 50 रुपये आहेत. तुम्ही ते ऑनलाइन देखील बुक करू शकता.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)