Anna Hazare : माझ्या कपाळावर जेव्हा पाकिस्तानच्या गोळ्या लागल्या तेव्हा…अण्णा हजारेंनी सांगितला तो थरार, काय केले आवाहन

अण्णा हजारे यांनी सांगितला तो थरारImage Credit source: टीव्ही ९ मराठी

Pahalgam Terrorist Attack Anna Hazare : 22 एप्रिल रोजी पहलगाम येथील बैसरन दरी परिसरात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. त्यात 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला. त्यात राज्यातील 6 पर्यटकांचा समावेश होता. या भ्याड हल्ल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी 1965 मधील भारत-पाकिस्तानच्या युद्धाची आठवण जागवली. त्याचवेळी त्यांनी या हल्ल्याच्या अनुषंगाने मोठे आवाहन केले आहे.

देशाने एकत्र यावे

काश्मीर येथे पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा दुर्दैवी आहे. तर पर्यटनाचे संबंध काही लोकांना नको आहे. त्यामुळे हा खोडसाळपणा त्यांनी केला. मात्र आता हे थांबणार नाही अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली. मी देखील त्या परिसरात काही दिवस राहिला होतो तो परिसर खूप सुंदर आहे. मात्र जाती-धर्म विचारून तुम्ही गोळीबार करतात ते सर्वात धोकेबाज असू शकते. यात जातीपातीचा संबंध नसल्याचे अण्णांनी म्हटलंय. काश्मीरचा संबंध देशाची कसा जोडता येईल हे पाहायचं आहे. तर लोकांनी न घाबरता चालत राहायचं असे अण्णांनी म्हटलं आहे.

सिंधू पाणी करार स्थगितीला पाठिंबा

‘पर्यटकांवर हल्ला करणं हा सगळ्यात मोठा दोष आहेत. ते पर्यटक आहेत. ते हिंदुस्तान किंवा पाकिस्तानकडून आले नाहीत. त्यांचा संबंध नाही. त्यामुळे त्यांच्याशी संबंध लावणं हे चूक आहे’, अशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. इतकंच नाहीतर भारताकडून मोठी कारवाई करत सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानसाठी थांबवणं ही कृती योग्य असल्याचे अण्णा हजारे म्हणाले. नाक दाबलं की तोंड उघडतं.. अशी म्हण आहे. त्याप्रमाणे सिंधू नदीचे पाणी थांबवणे ही कृती करणं गरजेची असल्याचे अण्णा हजारे म्हणाले.

गोळी लागल्यावर काय झाले?

1965 मध्ये भारत-पाकिस्तानच्या युद्धाच्या आठवणी अण्णा हजारे यांनी ताज्या केल्या. त्यावेळी आपण काश्मीरमध्ये होतो. आमच्या सैन्य तुकडीवर पाकिस्तानी लढवय्या विमानानी हल्ला केला होता. त्यात अनेक जवान शहीद झाले होते. माझ्या कपाळावर जेव्हा पाकिस्तानच्या गोळ्या लागल्या तेव्हा माझी भीतीच निघून गेली, असे अण्णा म्हणाले. माझ्याही डोक्याला गंभीर जखम झाली होती, असे ते म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)