सकाळची सुरुवात चांगल्या आणि निरोगी गोष्टींनी केली नाही तर त्याचे शरीरावर अनेक वाईट परिणाम होऊ शकतात. यामुळे शरीराची ऊर्जा पातळी कमी राहतेच पण एकूण आरोग्यावरही परिणाम होतो. त्याचवेळी जर कोणी सकाळी खूप हलका नाश्ता केला तर त्याला थोड्याच वेळात भूक लागते आणि जर कोणी जास्त खाल्ले तर पोट नेहमीच जड वाटते आणि कधीकधी पोटात गॅस देखील तयार होऊ लागतो. हे देखील महत्त्वाचे आहे की खाल्ला जाणारा नाश्ता पोषक तत्वांनी समृद्ध असावा. अशा वेळेस नाश्ता विचारपूर्वक घ्यावा. तर तज्ञांच्या मते नाश्त्यात कधीही खाऊ नयेत अशा 7 गोष्टी कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊयात. तसेच हे पदार्थ आपल्या हार्मोन्ससाठी चांगले नसून आरोग्याशी संबंधित अनेक समस्या वाढवण्याचे काम करतात. चला तरत मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात…
नाश्त्यात या 7 गोष्टी खाऊ नयेत
दुधासोबत ओट्सचे सेवन करू नका
पोषणतज्ञ म्हणतात की सकाळी उठल्यावर दुधासोबत कधीच चुकूनही कॉर्नफ्लेक्स, ओट्स, आणि म्यूसली खाऊ नका. कारण या पदार्थांमध्ये साखर मुबलक प्रमाणात असते आणि प्रथिनांचे प्रमाण नगण्य असते. यामुळे इन्सुलिनमध्ये वाढ होते आणि ऊर्जा कमी होते. त्याऐवजी, घरगुती ग्रेनेला नट्स किंवा सुकामेवा ग्रीक दह्यात घालून खावेत, ज्यामुळे साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहते.
कॉफी किंवा चहासह बिस्किटे
कॉफी किंवा चहासोबत बिस्किटे खाल्ल्याने शरीराला कोणतेही विशेष पोषण मिळत नाही, उलट ते रिकामे कार्बोहायड्रेट्स प्रदान करते, ज्यामुळे भूक कायम राहते आणि शरीराला गोड खाण्याची इच्छा होते. अशा वेळेस तुम्ही संतुलित जेवणानंतरच कॉफी किंवा चहा घ्यावा आणि बिस्किटांऐवजी नट्स किंवा अंडे खावे.
सँडविच
रिफाइंड ब्रेड आणि प्रोसेस्ड फिलिंग्जने भरलेले सँडविच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवतात आणि जळजळ करतात. पोषणतज्ञ सांगतात की, प्रथिनांसाठी संपूर्ण धान्य किंवा बाजरीची ब्रेड खाणे आणि अंडी किंवा चीजसह फायबरयुक्त भाज्याचे सँडविच बनवून खाणे हा एक चांगला पर्याय आहे.
उपमा किंवा पोहे
आहारतज्ज्ञ सांगतात की पोहे आणि उपमा हेल्दी वाटतात पण त्यात कार्बोहायड्रेट्स असतात ज्यामुळे तुम्हाला जास्त भूक लागते. अशा परिस्थितीत तुम्ही पोटभर नाश्ता करण्यासाठी 50% भाज्यांसह 60% उपमा किंवा पोहे मिक्स करून खावेत आणि त्यात पनीर, अंकुर किंवा दही टाकावे.
फळांचे रस आणि टोस्ट
फळांचा रस आणि ब्रेड टोस्ट एकत्र खाणे हे जरी काहीजणांना चांगला नाश्ता वाटत असला तरी या पदार्थमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. यामध्ये प्रथिने किंवा फायबरचे प्रमाण नसते. यामुळे इन्सुलिनची पातळी वाढते आणि भूकही भागत नाही. त्याऐवजी तुम्ही फळांचे सेवन करणे हा एक चांगला पर्याय आहे, जेणेकरून शरीराला फायबर मिळेल. प्रथिनेयुक्त नाश्त्यासाठी ते नट बटर टोस्ट आणि अंड्यांसोबत खाऊ शकता.
फ्लेवर्ड इन्स्टंट ओट्स
फ्लेवर्ड इन्स्टंट ओट्समध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि फायबर आणि प्रथिने कमी असतात. अशा परिस्थितीत काहीजणांना पुन्हा भूक लागते. यासाठी तुम्ही नाश्त्यात चिया बियाणे , नट बटर आणि काही फळांसह ओट्स खाणे हा एक चांगला नाश्ता आहे. यामुळे शरीराला संतुलित पोषण मिळते.
नाश्त्यात फक्त फळे खाणे
शरीराला ऊर्जा देण्यासाठी नाश्त्यात फक्त फळे खाणे हा चांगला पर्याय नाही. जेव्हा शरीराला फक्त कार्बोहायड्रेट्स मिळतात तेव्हा भूक लागते आणि मूड स्विंग्स वाढतात. अशा परिस्थितीत, फळांसोबत ग्रीक दही, उकडलेले अंडे किंवा कॉटेज चीज सारखे प्रथिनांचे काही स्रोतांचा आधार घेऊन तुम्ही नाश्त्याचे सेवन करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)