उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स ऐवजी ‘हे’ 5 हेल्दी ड्रिंक्स प्या, तुमचे शरीर होईल थंड

उन्हाळ्यात प्रत्येकजण निरोगी राहण्यासाठी आरोग्याची विशेष काळजी घेत असतो. तसेच हंगामानुसार आपण आपल्या आहारात देखील बदल करत असतो. कारण या ऋतूत शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली की डिहायड्रेशन ही एक सामान्य समस्या उद्भवते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला जेव्हा गरमी जाणवते तेव्हा प्रत्येकाच्या मनात पहिला विचार येतो तो म्हणजे थंड पेय पिण्याचा. उन्हाळ्यात थंड पेये प्यायल्याने शरीराला काही काळ थंडावा जाणवतो. पण चवीला चविष्ट असण्यासोबतच ते आरोग्यासाठीही हानिकारक असते.

म्हणून, उन्हाळ्यात थंड पेय पिण्याऐवजी, काही आरोग्यदायी पेय प्याव्यात. यासाठी तुम्ही सुद्धा काही हेल्दी पेये पिऊ शकता जी तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतील. ज्यामुळे तुमचे शरीर थंडगार तसेच हायड्रेटेड आणि ऊर्जावान राहील. चला तर मग आजच्या या लेखात, आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात सहज बनवता येणारे आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करणारे काही सर्वोत्तम पेये सांगणार आहोत.

लिंबू पाणी

उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने तुमचे शरीर डिटॉक्स होते आणि तुमचे शरीर ताजेतवाने राहते. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी तुमची त्वचा चमकदार बनवण्यास देखील मदत करते. शिवाय, ते पचन सुधारण्यास देखील मदत करते.

नारळ पाणी

उन्हाळ्यात तुम्ही दररोज नारळ पाणी पिऊ शकता. नारळाच्या पाण्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवतात आणि थंड देखील ठेवतात. शिवाय ते त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे.

बेलफळाचे ज्यूस

उन्हाळ्यात बेलफळाचे ज्यूस एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या आहारात बेलफळाच्या ज्यूसचा समावेश करावा. हे तुमचे आरोग्य निरोगी ठेवते आणि तुमचे शरीर हायड्रेट ठेवण्यास देखील मदत करते.

आंबा पन्ना

उन्हाळा म्हटंल की आपल्यापैकी प्रत्येकांना आंबे खायला आवडतात. तुम्ही कच्च्या आंब्याचा पन्ना देखील बनवू शकता. ते गोड, आंबट आणि चवीला चविष्ट आहे. याशिवाय, ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते.

ताक

उन्हाळ्यात अपचन, आम्लपित्त आणि गॅस यासारख्या पचनाच्या समस्या निर्माण होणे सामान्य आहे. जर तुम्हालाही पचनाशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही तुमच्या आहारात ताक समाविष्ट करू शकता. हे एक प्रोबायोटिक आहे, म्हणून ते आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. याशिवाय, ते शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)